Success Stories

शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. सध्या च्या युगात शेती व्यवस्था आणि शेती पद्धती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. परंतु हे बदल शेतीसाठी फायदेशीर आणि महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या लोक पारंपरिक शेती पद्धती ला कंटाळून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतातून उत्पन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Updated on 21 February, 2022 8:15 PM IST

शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. सध्या च्या युगात शेती व्यवस्था आणि शेती पद्धती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. परंतु हे बदल शेतीसाठी फायदेशीर आणि महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या लोक पारंपरिक शेती पद्धती ला कंटाळून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतातून उत्पन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले:

 शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान वापर वाढल्याने कमी वेळात शेतकऱ्याची कामे पटपट होऊ लागली आहेत. सोलापूर  जिल्ह्यातील  सोलापूर  दक्षिण तालुक्यातील एक तरुण आणि प्रगतशील शेतकऱ्याने अन्य शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. दक्षिण सोलापूर मधील मंद्रुप गावातील सुशिक्षित युवकाने चक्क 2 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे आसपासच्या शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत.सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावातील 22 वर्षीय श्रीकांत मुंजे हे BSC पदवी च्या शेवटच्या वर्षाला आहेत. कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा श्रीकांत मुंजे यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आणि तब्बल 2 महिन्याच्या काळात त्यामधून तब्बल 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

अवती भवतीच्या गावात या तरुणांचे मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा होत आहे. श्रीकांत ला पहिल्यापासून शाळेमध्ये अजिबात गोडी न्हवती. श्रीकांत ला शाळेपेक्षा शेती मध्ये जास्त आवड असल्याने श्रीकांत शेतामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करायचा. या मध्ये त्याचे वडील सुद्धा त्याला मदत करायचे. श्रीकांत कडे संपूर्ण आठ एकर शेती होती परंतु वडिलांच्या मार्गदर्शनामुळे श्रीकांत ने दीड एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली. याचबरोबर 2 एकर क्षेत्रावर त्यांनी द्राक्ष बागेची लागवड केली आहे आणि राहिलेल्या जमिनीत वेगवेगळ्या पिके घेऊन भरघोस उत्पन मिळवत आहेत.

या मध्ये श्रीकांत ला त्याचे वडील खूप मदत करतात असे सुद्धा त्याने सांगितले आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये पपई ची लागवड केली होती त्यामधून सुद्धा त्यांनी बक्कळ नफा मिळवला होता. श्रीकांत चे वडील शैलेश हे सुद्धा एक शिक्षित असून ते ग्रामसेवक या पदावर कामकाज बघतात परंतु त्यांना शेतीमध्ये आवड असल्याने ते नेहमी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून बघतात.शेतीमधील दीड एकर क्षेत्रावर त्यांनी युनिको कंपनीचे व्यंकट एफ वन या वाणाची लागवड केली. म्हणजेच त्यांनी दीड एकर क्षेत्रावर 8500 कलिंगडाच्या रोपाची लागवड केली. लागवडी नंतर योग्य व्यवस्थापन पाणी पुरवठा खत व्यवस्थापन यांची काळजी घेतल्यामुळे अवघ्या 60 दिवसांमध्ये कलिंगड तोडणीसाठी तयार झाली.

कलिंगड हे वजनाने जड तसेच रसाळ, गोड असल्यामुळे कलिंगडाच्या शेतावर व्यापारी वर्गाची गर्दी सुरू झाली. या वाणाची कलिंगडे जास्त दिवस राहतात म्हणून व्यापारी वर्गाने या कलिंगडाला साडे तेरा ते चौदा रुपये प्रति किलो एवढा भाव दिला आहे. यामुळे अवघ्या 2 महिन्यांच्या काळात दीड एकर क्षेत्रातून तब्बल 6 लाख रुपयांचा नफा मिळवला असल्याने सर्वत्र त्यांच्या नावाचे कौतुक होत आहे.

English Summary: Farmer's voice is open! 22-year-old Chuwatermelonwatermelon cultivation
Published on: 21 February 2022, 08:14 IST