गेली दोन वर्षे झाले कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत जसे की शेतीसाठी लागणारे मजूर भेटत नाहीत तसेच पाऊस कमी पडत आहे आणि पिकांवर वेगवगेळ्या रोगांची आक्रमकता त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. बाजारात भाजीपाला पिकांना योग्य असा भाव नसल्याने शेतकऱ्यांची मनस्थिती पूर्णपणे खालावली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी फळबाग पिकांकडे लक्ष देत आहेत.
तरुणांकडून फळबागेतून आर्थिक स्वयंपूर्णता मिळवण्याचा प्रयत्न:
कोरोनाच्या विषाणामुळे सगळीकडे लॉकडाउन पडल्याने खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे सुशिक्षित नोकर वर्गाने गावी येऊन शेतीकडे लक्ष देण्यास सुरू केले. जास्तीत जास्त शेतकरी शेतात फळबागा लावत आहेत कारण आधुनिक पद्धतीने शेती करून कमी खर्चात शेती केली जात असल्याने त्यात फायदा सुद्धा चांगला भेटत आहे.राजुरी गावातील सागर खोमणे असे शेतकऱ्याचे नाव आहे, सागर खोमणे यांचे एम.बी.ए. शिक्षण झाले आहे. सागर खोमणे या शेतकऱ्याने त्याच्या पाच एकरात सीताफळाची बाग लावली आहे, वर्षाला त्यांना दीड ते दोन लाख रुपये त्यांना बागेतून उत्पन्न भेटते
राजुरी येथील सागर खोमणे यांचे एम.बी.ए शिक्षण झाले असून त्यांनी शेतामध्ये पाच एकरात सीताफळ लावले आहेत, सीताफळ हे असे फळ जे की त्याला कोणत्याही प्रकारचे औषध, खत तसेच मजुरीचा खर्च कमी लागतो त्यामुळे सागर खोमणे यांनी सीताफळाची बाग लावून वर्षाकाठी दीड ते दोन लाख रुपये च उत्पन्न काढत आहेत.राज्य सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ही योजना राज्य सरकारने २०१८-२०१९ मध्ये सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना २० गुंठे जमीन असावी तर कोकणामधील शेतकऱ्यांसाठी ही योजना शिथिल करण्यात आली आहे त्यांना १० गुंठे जमीन असावी. राज्य शासनाचे इतर फळबागेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ नाही घेता येणार.
भाऊसाहेब फुंडळकर योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या नावावर ७/१२ असला पाहिजे तसेच शेतकऱ्याचे कुटुंब फक्त शेतीवरच अवलंबून असले पाहिजे त्या लोकांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य भेटते. अनुसूचित जाती जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यांग व्यक्तींना या योजनेत प्राधान्य भेटले जाते.योजनेमध्ये कोणती फळे समाविष्ट आहेत जसे नारळ, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ, आवळा,चिंच, जांभूळ, फणस, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम.
Published on: 09 July 2021, 08:16 IST