शेती या व्यवसायात यशापेक्षा अपयश ठरलेले असते त्यामुळे जो नव्याने शेतकरी शेती (farming) करतो तो नंतर शेतीकडे तोंड सुद्धा ओळवत नाही. परंतु हा एक गोड गैरसमज लातूर मधील शेतकऱ्याने दूर केला आहे. प्रगतशील द्राक्षे बागायतदार शेतकऱ्याने युरोप खंडात जी द्राक्षे पपाठवली होती त्यामध्ये दोष दाखवून ती द्राक्षे समुद्रात फेकून दिली आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत त्याला बाग मोडावी लागली मात्र न घाबरता त्याने भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला आणि सीताफळाची बाग धरली. बाळकृष्ण नामदेव येलाले हे या शेतकऱ्याचे नाव असून ते लातूर जिल्ह्यातील जाणवळ येथे राहतात. त्यांचा हा प्रवास म्हणजे दुसऱ्यांची एक प्रेरणा आहे. व्यवसाय म्हणून त्यांनी शेतीकडे पाहिले नाही तर बाजारभाव तसेच काळानुसार बदल याचा अभ्यास करून त्यांनी द्राक्षाची बाग मोडली आणि सीताफळाची बाग धरली.
म्हणून केली सिताफळाची निवड:-
बाळकृष्ण नामदेव येलाले यांनी २०११ साली एन एम के गोल्डन या जातीच्या सिताफळाची लागवड केली जे की या जातीच्या फळाला मोठी फळधारणा होते . झाडाचे फळ तोडले की चौथ्या दिवशी फळ तयार होते. तुम्ही या जातीच्या सीताफळाचे झाड लावले की चार वर्षानंतर फळे येण्यास सुरू होते. या जातीच्या एका फळाचे ५०० ते ७०० ग्रॅम वजन भरते. जाणवळ हा डोंगरी भाग असून तिथे जाणवळ हा डोंगर असून तिथे रानटी जनावरे असतात आणि ते पिकांची नासाडी करतात.
सीताफळाच्या झाडाच्या पानांचा उग्र वास असल्याने ती जनावरे जवळ येत नाहीत. या झाडाला कमी प्रमाणात पाणी लागते जर जास्त पाणी झाले तर फळ कमी येतात.फुलधारणा करताना सुरुवातीस कमी पाऊस झाला त्यामुळे फळ धरली गेली. आता झाडांना खूप प्रमाणत फळे लागलेली आहेत की झाडे फळाने लगदली आहेत. येईल या आठ दिवसात फळ तोडणीस येईल.
सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का?
२०११ साली बाळकृष्ण येलाले यांनी सात एकरात सीताफळ लावले. आता पर्यंत चार ते पाच सिजन झाले. सुरुवातीस जास्त तेजी असल्याने भाव मिळाला नाही. दलाल लावण्यापेक्षा स्वतः मार्केट ला जाऊन अभ्यास केला. सध्या सीताफळाचा २५ रुपये किलो ने भाव चालू आहे. दरवर्षी बागेला ५० हजार एवढा खर्च येतो तर एकरी ५ ते १० टन एवढे उत्पादन निघते. मागील दोन वर्षात सात एकरात ४० लाख रुपयांचे उत्पन्न निघाले होते.
Published on: 30 October 2021, 03:00 IST