शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करण्यामध्ये शेतकरी आता कुठल्याही प्रकारे कमी पडत नाही. योग्य नियोजन आणि आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे.
कधीकधी शेतीमध्ये अशा प्रकारची किमया शेतकरी करून दाखवतात तर विश्वास बसू शकत नाही. परंतु अशा गोष्टी करून दाखवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यामध्येच आहे.याचे प्रत्यंतर वेळोवेळी येते. अशीच एक हटके किमया चांदवडच्या भरवीर या गावच्या शेतकऱ्यानेकरून दाखवलीआहे.या लेखामध्ये या शेतकऱ्याची यशोगाथा पाहू.
चांदवडच्या शेतकऱ्याची हटके किमया
चांदवड तालुक्यातील भरवीर या गावचे शेतकरी रघुनाथ जाधव त्यांनी रताळ्याची लागवड केली होती. रताळ्याची लागवड करताना त्यांनी पारंपारिक पद्धत सोडून बेडपद्धत वापरून निव्वळ 18 गुंठे क्षेत्रात रताळ्याची लागवड केली. निव्वळ 18 गुंठा मध्ये या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले. परंतु या रताळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रघुनाथ जाधव यांनी पिकवलेल्या एका-एका रताळ्याचे वजन थोडेथोडके नाही तर तब्बल साडे सहा ते सात किलोपर्यंत भरले.
जाधव यांनी 18 गुंठ्यामध्ये रताळ्याची दहा टन उत्पन्न काढले त्यांनी या रताळ्याची विक्री मालेगाव आणि मनमाड या त्यांच्या जवळच्या बाजारपेठांमध्ये विकले व दोन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री केली. तसेच या महाशिवरात्रीच्या प्रसंगी सर्व माल हा जागोजागी विकला गेला आहे.महाशिवरात्र असल्यामुळे आता यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने व त्या दृष्टीने त्यांनी नियोजन करून रताळ्याची लागवड चार महिन्यांपूर्वी केली होती.
अशा पद्धतीने केली नियोजन
जाधव यांनी लागवड केलेल्या रताळ्याचे व्यवस्थापन करताना जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला आणि पोषक विद्राव्य खतांचा देखील वापर केला.
यासाठी जवळजवळ त्यांना सगळे मिळून अठरा गुंठा साठी सात ते आठ हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला.रताळ्याचे पीक पक्व होण्यासाठी पूर्णता चार ते पाच महिन्यांचा वेळ लागतो. परंतु त्यांनी घेतलेल्या रताळ्याचे आकार आणि वजन पाहून शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Published on: 03 March 2022, 01:37 IST