स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे अगोदर असा समज होता की शहरी भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षा देण्यासाठी सक्षम आहेत.
परंतु आता मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पुत्र आणि शेतकरी कन्या यांनी एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अफाट कष्टाच्या जोरावरघवघवीत यश प्राप्त केले आहे.शेतकरी पुत्र आणि शेतकरी कन्यांनी दाखवून दिले आहे की हम भी किसीसे कम नही. या लेखात आपण अशाच एका शेतकरी पुत्राच्या यशाची माहिती करून घेऊ.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी पुत्र शुभम पांडुरंग जाधव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 445 रँक मिळवून प्रथम श्रेणी मिळवली आहे.शुभम जाधव यांचा जन्म 1995 साली एक शेतकरी कुटुंबात झाला. शुभम यांचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी व माळीनगर तालुका माळशिरस येथे झाली.अकरावी आणि बारावी या शिक्षणासाठी ते हडपसर येथील साधना महाविद्यालयात दाखल झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुणे येथील फरगुशन कॉलेज मधून अर्थशास्त्र मध्ये पूर्ण केले.
त्यानंतर इंदिरागांधीओपनयूनिवर्सिटीमधूनराज्यशास्त्रविषयातएम ए केलेआहे. तसेचशिवमहे नीट परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत.
शुभम यांचा हा प्रयत्न होता व ती मुलाखत होती. त्याच्या आदर्शांचा विचार केला तर ते त्यांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांना आदर्श मानतात. प्रशासकीय सेवेत जायचे हे त्यांचे शालेय शिक्षणापासूनध्येयहोतंय अपाटकष्टाच्या जोरावर ते पूर्ण केले.( संदर्भ – सकाळ)
Published on: 25 September 2021, 10:46 IST