Success Stories

अनेक शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही. शेतीला पाणी नाही म्हणून शेती परवडत नाही असेही कारणे दिले जातात. या सर्व संकटावर मात करत पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात राहणाऱ्या शेतकऱ्याने दोन एकर शेतात पपईची लागवड केली होती.

Updated on 26 September, 2022 1:29 PM IST

पंढरपूर : अनेक शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही. शेतीला पाणी नाही म्हणून शेती परवडत नाही (Cultivation papaya) असेही कारणे दिले जातात. या सर्व संकटावर मात करत पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात राहणाऱ्या शेतकऱ्याने दोन एकर शेतात पपईची लागवड केली होती.

माळशिरस तालुक्यात कोरडे म्हणून ओळखले जाते. कण्हेर येथील बाळासाहेब आणि रामदास सरगर या शेतकऱ्यांनी आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन एकर शेतात पपईची २१०० रोपे लावली होती. आणि आज त्याच पपईचा संपूर्ण भाग फुलला आहे.कमी खर्चात वर्षाला 22 लाखांपर्यंत चांगला नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.

आता आठ महिन्यांची मेहनत आणि योग्य नियोजनामुळे त्यांना 22 लाख रुपयांचा चांगला नफा मिळत आहे. शेतकरी बांधवांनी केलेला हा प्रयोग आता इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

देशात ‘लम्पीचा’ धुमाकूळ; राज्यातील मृत्यूचा आकडा वाढला, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी..

शेतकरी बाळासाहेब व रामदास यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या पपईच्या बागेतील एका झाडाला ६० ते ८० फळे येतात. दुष्काळी भागातील जिरायती शेतीने आता बागायतीचे रूप धारण केले आहे, हे शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन व मेहनतीतून साध्य केले आहे, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

लंम्पी रोग आता हायकोर्टात, राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल

कण्हेर गावच्या पपला इतर राज्यातून मागणी वाढत आहे. सरगर शेतकऱ्याच्या पपईला चेन्नई आणि कोलकाता येथून अधिक मागणी आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त यामुळे पपईला भाव वाढतो.

शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना; आता पैसे होणार डबल

English Summary: farmer earned a profit of 22 lakhs by cultivating papaya in dry land farming
Published on: 26 September 2022, 01:29 IST