Success Stories

जर आपण पाहिले तर बर्यााच जणांच्या मनामध्ये असे असते की स्पर्धापरीक्षा म्हटली म्हणजे शहरी भागातील मुलांना पेलवणारी सगळ्या आर्थिक सोयीसुविधा असलेल्या मुलांनाच उत्तीर्ण होणे शक्यी असते.

Updated on 10 March, 2022 7:34 PM IST

जर आपण पाहिले तर बर्‍याच जणांच्या मनामध्ये असे असते की स्पर्धापरीक्षा म्हटली म्हणजे शहरी भागातील मुलांना  पेलवणारी सगळ्या आर्थिक सोयीसुविधा असलेल्या मुलांनाच उत्तीर्ण होणे शक्‍य असते.

परंतु अफाट जिद्द,काटेकोर नियोजन,अभ्यासाचे व्यवस्थित व्यवस्थापन आणि काही झाले तरी मनात भरलेली स्वप्नांची गंगा पार करण्यासाठीआवश्यक असणारी धडपड या गोष्टी जर असल्या ना तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे अशक्य नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून आपण पाहत आहोत की, स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी विद्यार्थ्यांच्या सोबतच ग्रामीण भागातील अगदी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी यश संपादन करत आहेत.या लेखामध्ये आपण अशाच एकाशेतकरी कन्यानेमिळवलेल्यायशाची माहिती घेणार आहोत.

 शेतकऱ्याची मुलगी झाली पीएसआय                                                                

 लातूर जिल्ह्यातील मासूर्डी या लहानश्या गावातील प्रतिक्षा पिंपरे या शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत249 गुण मिळवत मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.एका छोट्याशा खेड्यातूनयेऊनया शेतकरी कन्येने मिळवलेल्या या यशामुळेसंपूर्ण तालुक्यातून या शेतकऱ्याच्या मुलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

जर प्रतिक्षा पिंपरे यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तरप्रतिक्षा या त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठ्या.त्यांचे वडील सुरेश पिंपरे व आणि शोभा पिंपरेहे मासूर्डी गावातील एक अल्पभूधारक शेतकरी दांपत्य आहे. प्रतिक्षाया लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार व जिद्दी होत्या.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भादा येथे झाली असून बारावीपर्यंतचे शिक्षण औसा येथे आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण लातूर येथीलदयानंद महाविद्यालय व महात्मा बसवेश्वर येथे झाले.त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाप्रतिक्षा यांचे काका यांनीप्रतीक्षा लास्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला दिला. प्रतिक्षा यांच्या आई-वडिलांना या परीक्षा बद्दल अधिक माहिती नव्हती परंतु मुलीवर पूर्ण विश्वास होता की ती काहीतरी करून दाखवेन.त्यामुळे त्यांनीप्रतिक्षा यांना पुणेजाण्याची परवानगी दिली.पुण्यात होस्टेलमध्ये राहून प्रतिक्षाने 2017 या वर्षापासून परीक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली. 

विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे क्लासेस न करता स्वतःच्या अभ्यासावर पूर्ण विश्वास ठेवून व नियोजनाने अभ्यास केला. 2019 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीपरीक्षा दिलीव या परीक्षेचा निकाल विशेष म्हणजे आठ तारखेला जागतिक महिला दिनाच्या दिवशीच लागला.यामध्ये प्रतीक्षा यांनी मुलींमध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला.गावकऱ्यानी त्यांचा सत्कार केला व संपूर्ण तालुक्यातून देखील प्रतीक्षा व अभिनंदन चा पाऊस पडत आहे.( संदर्भ-सकाळ)

English Summary: farmer daughter get fabulous success in mpsc exam and become psi
Published on: 10 March 2022, 07:34 IST