गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न वाढतच चालला आहे. अनेकांचे ऊस १५ महिने झाले तरी तुटले नाहीत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. असे असताना अनेकांनी यामध्ये संधी शोधली तर काहींनी कारखान्यावर जाऊन जाऊन उंबरे झिजवले. मात्र सध्या देखील हा प्रश्न मिटलेला नाही. असे असताना अनेकांनी या परिस्थिती लाखो रुपये कमवले आहेत. यामुळे काहींना अतिरिक्त ऊस फायद्याचा ठरला आहे.
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महादेव कवडे यांना तर 15 वर्षापूर्वीच या समस्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी निवडलेला वेगळी वाट आज खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे. अनेकदा कारखान्यांकडून ऊसतोडणीसाठी केली जाणारी टाळाटाळ आणि ऊस बिलासाठी होत असलेला त्रास लक्षात घेता त्यांनी स्वता:च्या शेतामध्येच गुऱ्हाळ सुरु केले होते.
यामध्ये ते केमिकलमुक्त गुळ तयार करतात. यामुळे ते यामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवतात. तसेच कोणाच्या मागे देखील लागण्याचा प्रश्न येत नाही. यामुळे हे एक फायदेशीर ठरत आहे. महादेव कवडे हे पारंपरिक पिकाप्रमाणेच ऊसाची लागवड करतात. याआधी त्यांना ऊस गाळपाच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. यामुळे याबाबत त्यांनी अभ्यास करून निर्णय घेतला, आणि आज तो फायदेशीर ठरत आहे.
त्यांच्याकडे जास्त भांडवल नसल्याने त्यांनी 5 गुंठ्यामध्ये हे गुऱ्हाळ टाकले. आता गेल्या 15 वर्षापासून त्यांचे हे काम सुरु असून त्यांच्या गुळाला चांगली मागणी आहे. त्यांनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून घरच्या ऊसाचा तर प्रश्न मार्गी लागलाच पण कवडे यांच्या वर्षाकाठच्या उत्पादनात 5 ते 6 लाखांची भर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी इतर पर्याय शोधणे गरजेचे आहे. अनेकांनी असे पर्याय देखील शोधले आहेत.
सध्या उसाबाबत परिस्थिती खूपच अवघड झाली आहे. अनेकांचे ऊस गाळप हंगाम संपत आला तरी शेतातच आहेत. यामुळे वजनात मोठी घेत होणार आहे. तसेच ऊस दराचा प्रश्न तर पाचवीलाच पुजला आहे. यामुळे आता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने गेल्यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या;
ठाकरे सरकारने अखेर निर्णय घेतलाच!! शेतकऱ्यांना कोर्टकचेरीतून मोठा दिलासा..
आई वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज, शेतकऱ्याची लेक झाली अधिकरी
आख्ख मार्केट आता आपलंय!! बीडच्या शेतकऱ्यानं मार्केटच ताब्यात घेतल, लाखोंचा फायदा..
Published on: 28 March 2022, 05:21 IST