भारत हा एक कृषी प्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे शिवाय शेती आणि पशुपालन हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. सध्या शेती मध्ये अमुलाग्र बदल घडून आलेले आहेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर, मुबलक पाणी आणि विज्ञानाने साधलेली प्रगती आणि इतर सुख सोयी यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. शिवाय पीकपद्धती मध्ये बदल झाला आहे.
पीक पद्धती मध्ये बदल:-
आपल्या देशात हंगामानुसार शेतामध्ये पिके घेतली जातात. प्रामुख्याने आपल्याकडे 2 हंगाम असतात एक म्हणजे रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम त्यामुळे ठराविक अश्या हंगामात ठराविक पिकांसाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे ठराविक पिके ज्या त्या हंगामात घेतली जातात. परंतु अलीकडच्या काळात अनेक बदल घडून आले आहेत शिवाय विज्ञानाने केलेली प्रगती यामुळे पीकपद्धती मध्ये मोठा बदल घडून आला आहे. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या हेतून हंगामाचा विचार न करता विविध पिके घेऊन बक्कळ पैसे कमवले जात.
शेतकरी वर्गावर संकटाची मालिका कायम चालूच असते परंतु या सर्व गोष्टींवर मात करून चक्क या व्यक्तीने तब्बल पपई लागवड करून 22 लाख रुपये कमवले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तसा दुष्काळी तालुका, पाण्याची कमतरता आणि प्रत्येक वर्षी पडणारा दुष्काळ यासारख्या गोष्टींचा विचार न करता चक्क सोलापूर जिल्ह्यातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या दोन्ही भावांनी माळरानावर पपई ची लागवड केली. माळरानावर असलेल्या पावणे दोन एकर शेत जमिनीवर या दोन्ही भावांनी 2100 पपई च्या रोपांची लागवड करून काबाडकष्ट करून अवघ्या 9 महिन्याच्या काळात त्यातून त्यांनी 22 लाख रुपये कमवले आहेत. या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे एका झाडाला कमीत कमी 80 ते 90 पपई चे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.
हेही वाचा:-लम्पी स्कीन’च्या अफवे मुळे हे व्यवसाय तोट्यात, वाचा सविस्तर
तसेच माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावच्या माळरानात फुललेल्या पपई च्या बागेतील फळांना बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे येथून महाराष्ट्र तसेच चेन्नई कोलकत्ता बेंगलोर या सारख्या राज्यातून सुद्धा पपई ची मागणी अधिक वाढत आहे. यामधून एक खासियत म्हणजे विक्रमी उत्पन्न मिळाले परंतु यामध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला नाही असे सुद्धा यांनी सांगितले आहे. पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर आणि पारंपरिक पद्धतीने शेती करून 22 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
Published on: 24 September 2022, 04:28 IST