Success Stories

शेती असो या नोकरी जर आपला निश्चय पक्का असेलव जिद्द असेल तर कुठलेच काम अशक्य नाही. वर्तमान परिस्थितीत असे अनेक यशस्वी शेतकरी आहेत ते आधुनिक पद्धतीने शेती करून एक आदर्श निर्माण करीत आहेत. तसेच शेती एक नफ्याचा व्यवसाय आहे हे सिद्ध करून दाखवीत आहेत.

Updated on 02 September, 2021 5:45 PM IST

 शेती असो या नोकरी जर आपला निश्चय पक्का असेलव जिद्द असेल तर कुठलेच काम अशक्य नाही. वर्तमान परिस्थितीत असे अनेक यशस्वी शेतकरी आहेत ते आधुनिक पद्धतीने शेती करून एक आदर्श निर्माण करीत आहेत.  तसेच शेती एक नफ्याचा व्यवसाय आहे हे सिद्ध करून दाखवीत आहेत.

अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी पठाणकोट जिल्ह्यातील जंगला गावचे राहणारे रमण सलारिया हे एक आहेत. सलारिया हे अनेक वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट ची शेती करून चांगला नफा मिळवीत आहेत. या लेखात आपण त्यांच्या यशस्वीतेचे कहानी पाहणार आहोत.

 इंजीनियरिंग ची नोकरी सोडली परत आले आपल्या गावी

 रमण सलारिया पठाणकोट च्या जंगलाया गावचे रहिवासी आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आपली नोकरी सोडून गाव गाठले.गावात परत आल्यानंतर तेशेतीला लागणारा खर्च आणि श्रम कमी कसे करता येईल याबद्दल काम करीत आहेत.तसेच ड्रॅगन फ्रुट शेती करून चांगला नफा कसा कमवता येईल यासाठी शेतकऱ्यांना  प्रेरित करीत आहेत.

 सलारिया यांच्या मनात ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्याचा विचार कसा आला.

रमण सलारीया हे नोएडा येथील एका कंपनीत इंजिनीअर या पदावर कार्यरत होते.नोकरी करीत असताना त्यांच्या मनात नोकरी सोडून शेती करण्याचा विचार आला.त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपल्या गावी परत आले वत्यानंतर ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्याची सुरुवात केली.ड्रॅगन फ्रुट ची शेती ची सुरुवात करताना त्यांनीसुरुवातीला सहा लाख रुपयेभांडवल गुंतवून सुरुवात केली. आता सध्या ते एका एकर जमिनीत ड्रॅगन फ्रुट ची शेती करून प्रति वर्ष आठ ते दहा लाख रुपयांची कमाई करीत आहेत.

 ड्रॅगन फ्रुट पासून होते चांगली कमाई

 

 ड्रॅगन फ्रुट पासून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात.जर शेतकऱ्यांनीत्यांनी  पिकवलेल्या ड्रॅगन फुटला बाजारात ठोक भावात विकले तर ते 250 ते 300 रुपये प्रती किलो या भावात विकले जाते.एका एकरात ड्रॅगन फ्रुटचीशेती करण्यासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च येतो.त्यापासून प्रतिएकर 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. सर्व खर्च वजा करता निव्वळ नफा हा प्रति एकर सात ते आठ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो.

 रमन सलारिया यांचा शेतकऱ्यांसाठी संदेश

 रमण सलारिया यांचे सांगणे आहे की,शेतकरी बंधूंनी अशा पिकांची लागवड करावी की ज्यामध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. ड्रॅगन फ्रुट च्या शेती मधूनही अधिक नफा कमावता येऊ शकतो.

 

 

English Summary: earn more than lakh rupees through dragon fruit farming
Published on: 02 September 2021, 05:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)