सध्या अनेकजण शेतीपूरक व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत. सध्या दुग्ध व्यवसायाला देखील चांगले दिवस आले आहेत. अनेकजण दूध विकून यामधून चांगले पैसे कमवत आहेत.
आता पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जयपूरचा एक व्यक्ती अनोखे काम करत आहे. हा व्यक्ती यामधून करोडो रूपये देखील कमवत आहेत. तसेच अनेकांना देखील यामुळे काम मिळाले आहे.
भीमराज शर्मा गाईच्या शेणापासून तब्बल 70 प्रकारच्या विविध पर्यावरणपूरक वस्तू तयार करत आहेत. याची विक्री करून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरू आहे.
तुमच्याकडे 10 पैशांची ही नाणी आहेत का? एका मिनिटात मिळतील लाखो रुपये..
भीमराज शर्मा यांनी शेणापासून बनवलेल्या देवदेवतांच्या मूर्ती आणि अनेक विविध वस्तूंची चांगली विक्री होते. शर्मा गाईच्या शेणापासून गोकृती नावाने कागद बनवतात. तसेच, विविध प्रकारच्या स्टेशनरी वस्तू देखील बनवतात. त्यांनी 2017 मध्ये शेणापासून उत्पादने बनवण्यास सुरुवात केली.
तसेच त्याचे त्यांना पेटंट मिळाले आहे. सध्या ते एक कोटींची उलाढाल करत आहेत आणि एका वर्षात 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त लोकं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे.
Raju Shetti: 'मुकादमांच्या फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार अडचणीत'
त्यांनी ताजे शेण खरेदी करून, ते यंत्राच्या साहाय्याने मिसळून कपड्यांचे बारीक तुकडे केले. तुकडे चांगले मिसळून त्याचा कागद तयार केला जातो. कागद रंगीबेरंगी करण्यासाठी हळद आणि सेंद्रिय उत्पादने वापरली जातात.
महत्वाच्या बातम्या;
औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली खेकडा पालनाला सुरुवात, आता कमवतोय ६ लाख
Soyabean Rate Today: आज सोयाबीनच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर
Published on: 06 November 2022, 03:29 IST