Success Stories

कुशीनगर जिल्ह्यातील कृषी वैज्ञानिक ने देशातील विविध भागातील हवामानाला टिकाव धरू शकणाऱ्या आणि उच्च रोग प्रतिरोधी आणि उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गव्हाच्या 20 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या कामासाठी त्यांना इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक अंड प्लांट ब्रीडिंग( आय एस जी पी बी ) कडून फेलोशिप 2020 मिळाली आहे. आतापर्यंत देशातील जवळजवळ 11 कृषी वैज्ञानिकांना ही फेलोशिप देण्यात आली आहे.

Updated on 26 June, 2021 2:07 PM IST

 कुशीनगर जिल्ह्यातील कृषी वैज्ञानिक ने देशातील विविध भागातील हवामानाला टिकाव धरू शकणाऱ्या आणि उच्च रोग प्रतिरोधी आणि उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गव्हाच्या 20 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या कामासाठी त्यांना  इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक अंड प्लांट ब्रीडिंग( आय एस जी पी बी ) कडून फेलोशिप 2020 मिळाली आहे. आतापर्यंत देशातील जवळजवळ 11 कृषी वैज्ञानिकांना ही फेलोशिप देण्यात आली आहे.

कसया तालुका तील सखवनिया गावचे रहिवासी असलेले वैभव यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली येथे कृषी वैज्ञानिक ( शोध) या पदावर कार्यरत आहेत. वैभव यांनी एचडी 3178 पूजा वत्सला,  एच आय 8737 पूजा अनमोल,  एचडी 3226, एचडी 3271 इत्यादी प्रकारच्या जवळ-जवळ गव्हाच्या वीस जाती विकसित केले आहेत. या प्रजाती  मधील एचडी 3226 व एचडी  3271 या प्रजाती पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार जिल्ह्यातील हवामानाला अनुकूल अशा  आहेत. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर स्वतः वैभव यांनी पत्रकारांना ऑनलाइन दिली. वैभव यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन प्रजातींची रोग प्रतिरोधक क्षमता उच्च आहे.

त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन उत्पादन खर्चही कमी येईल. तसेच त्यांनी सांगितले की 2050 पर्यंत देशाची लोकसंख्या जवळजवळ  1.7 अब्ज होईल. देवा देशाला जास्त अन्नधान्याची गरज भासेल आणि ही समस्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी वैज्ञानिक यांच्या  समोर आहे असे त्यांनी सांगितले.

 दुसरे आव्हान म्हणजे हवामानामध्ये होत असलेला नियमित बदल हा आहे.  कमी उत्पादन खर्च आणि कमी वेळेत तयार होणाऱ्या प्रजाती विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. तसेच संशोधन करण्यात येत असलेल्या नवीन प्रजाती हा देशातील विविध प्रदेशातील विविध हवामान, विविध प्रकारची माती इत्यादी मध्ये समान पद्धती टिकून राहतील अशा पद्धतीने त्यांना विकसित करण्यात येत आहे.

 

 वैभव यांना फेलोशिप मिळाल्याची माहिती त्यांच्या पैतृक गावामध्ये मिळाल्यानंतर गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वैभव यांनी त्यांचे इंटरमीडिएट पर्यंतचे शिक्षण हे गावातील इंटर कॉलेज येथे सन 1999 मध्ये उत्तीर्ण केले आहे. कृषी क्षेत्रातील बीएससी त्यांनी कोल्हापूर विश्वविद्यालय येथून पूर्ण केली. तसेच एम एस सी चंद्रशेखर आजाद कृषि विश्वविद्यालय आणि पंतनगर विश्वविद्यालय येथून पीएचडी पूर्ण करून त्यांनी कृषी वैज्ञानिक या पदावर काम करणे सुरू केले. या यशासाठी त्यांना चंद्र भूषण सिंह, बलवंत सिंह, दिवाकर राव, रामशंकर मनी त्रीपाठी, शैलेंद्रसिंह इत्यादींनी  शुभेच्छा दिल्या.

English Summary: discover of wheat specise
Published on: 26 June 2021, 02:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)