Success Stories

तिसंगी येथील एका प्रयोगशील जिगरबाज शेतकर्‍याने एका एकरात चौदा तोड्यात 53 टन उत्पादन घेतले आहे. शिवाजी शिंदे असे त्या धाडशी प्रयोगशील शेतकर्‍याचे नाव असून ढोबळी मिरची, टोमॅटो तर जुन्याच ढोबळी मिरचीच्या पायाभूत यंत्रणेवर बीन्सची वेल चढवून आगळे-वेगळे प्रयोग करीत यशस्वी झालेला हा शेतकरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आणि शेतीला प्रेरणादायी वस्तुपाठ आहे.

Updated on 25 February, 2022 9:53 AM IST

तिसंगी येथील एका प्रयोगशील जिगरबाज शेतकर्‍याने एका एकरात चौदा तोड्यात 53 टन उत्पादन घेतले आहे. शिवाजी शिंदे असे त्या धाडशी प्रयोगशील शेतकर्‍याचे नाव असून ढोबळी मिरची, टोमॅटो तर जुन्याच ढोबळी मिरचीच्या पायाभूत यंत्रणेवर बीन्सची वेल चढवून आगळे-वेगळे प्रयोग करीत यशस्वी झालेला हा शेतकरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आणि शेतीला प्रेरणादायी वस्तुपाठ आहे.

या यशोगाथा रचण्यासाठी जणू मदतगार म्हणून वीरा अ‍ॅग्रोची टीम, वृषाल पाटील, हजारे आणि वीरा अ‍ॅग्रोची सर्व उत्पादने ठरली आहेत. एकूण 14 एकर क्षेत्र असले तरी 11 एकर इतर पिके घेऊन तीन एकरात नेहमी फळभाज्या ते पिकवितात. वृषाल पाटील यांच्यासह टीमच्या मार्गदर्शनाखाली 27 जुलैला इंडस-11 जातीच्या ढोबळी मिरचीची लागण केली. 17000 रोपे लावली होती. आज अखेर 14 तोडे झाले असून 53 टन इतके दिव्य उत्पादन त्यांनी घेतले असून अजून प्लॉट पूर्ण हातात आहे. 40 टन उत्पादनाची अपेक्षा धरून केलेल्या लागणीत प्लॉट सुरू असतानाच 53 टन उत्पादन निघाले असून दीडपट उत्पादन अधिक निघाले असून आणखी काय हवे? असा प्रतिसवाल त्यांनी केला. किमान 28 रु. ते कमाल 53 रुपये दर आपल्या मालास मिळाला आहे.

ढोबळीच्या जुन्या रोपांवर चढवली बीन्सची वेल

तिसर्‍या एका प्लॉटमध्ये ढोबळी मिरचीचा जुना प्लॉट होता. तो खराब होत आला असला तरी त्याच प्लॉटमधील मल्चिंग, खते व बांधणी यांचा वापर करीत ढोबळी मिरची दरम्यान बीन्स लागवड करून त्याची वेल ढोबळी मिरचीवर चढवली. जर अलेक्स हे औषध फुल आणि फळ सेटिंगमध्ये ढोबळी मिरचीला उपयुक्त ठरले असेल तर ते बीन्सला का उपयोगी पडणार नाही? तेथेही ते आपली कमाल दाखवेल म्हणून वापरले असता त्याच जुन्या प्लॉटमध्ये लागण करूनही 16 टन बीन्सचे उत्पादन निघाले. सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन प्लॉट न करता जुन्या ढोबळी मिरचीचे मल्चिंग, ड्रीप, खते, जुनी रोपे व बांधणी यांचा वापर झाल्याने दीड लाख रुपयांचा खर्च वाचवला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

अलेक्सची कमाल

वीरा अ‍ॅग्रोचे क्रांतिकारी प्रॉडक्ट असणारे अलेक्स-99 हे औषध वापरले असून त्याचा अतिशय सुंदर रिझल्ट अनुभवला आहे. अक्षरशः ढोबळीची फुले आणि सेटिंग यांचे घस लागलेले अनुभवले आहे. 20 ते 25 मिरचीचे एका जागी सेटिंग झालेले आपण पहिल्यांदा अनुभवले असून ही वीरा अ‍ॅग्रोच्या अलेक्सा-99 या प्रॉडक्टची कमाल धमाल कामगिरी आहे, असे माझे स्पष्ट मत आहे, असेही शिवाजी शिंदे म्हणाले. यासोबत आयबी सुपर, मेरिट अशी सर्व उत्पादने वापरली असून ती प्रभावी ठरली आहेत.

दुसर्‍या दोन एकरात एक एकर टोमॅटोचा दुसर्‍या एकरात बीन्सची लागवड त्यांनी केली होती. जेके-811 या जातीच्या टोमॅटो प्लॉट आणि दर यांनी पाच महिने साथ दिली. 25 टन उत्पादन निघाले. 40 रु. पर्यंत सुरुवातीस दर मिळाला. पण प्लॉट तरीही फायद्यात राहिला.
(संपर्क – शिवाजी शिंदे, शेतकरी : 9021741752)

English Summary: Dhobli (Shimla) Chili gives good yield to Sangli farmers, yields 53 tons per acre
Published on: 25 February 2022, 09:53 IST