शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी पीक पद्धतीत बदल करणे महत्त्वाचे ठरते या समवेतच शेतकरी बांधवांनी आंतरपीक म्हणून मुख्य पिकात इतर पिकांची शेती करणे देखील महत्त्वाचे आहे कारण की यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.
आंतर पीक सध्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे, कारण एकाच वेळी दोन पिके घेतल्याने तुम्हाला एकावेळी दुप्पट नफा मिळतो. आंतरपीक शेतीतून कशा पद्धतीने दुहेरी नफा मिळवला जाऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत एका उदाहरणाच्या माध्यमातून. आज आपण उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधल्या दोन शेतकऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. या दोन शेतकऱ्यांनी उसाच्या पिकात डाळी वर्गीय पिकांचे तसेच भाजीपाल्याचे आंतरपिक घेऊन लाखो रुपये कमवले आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे दोन्ही शेतकरी उत्तर प्रदेश राज्याचे आहेत यापैकी एक शेतकरी बुलंदशहर भागातील मौजे एतमादपूर येथील रहिवासी रतनपाल सिंह आहेत तर दुसरे शेतकरी जहांगीराबाद भागातील मौजे चारोरा येथील रहिवासी नागेंद्र आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.
मित्रांनो शेतकरी रतनपाल आणि नागेंद्र या दोघांनीही त्यांच्या ऊस पिकात आंतरपीक घेतले आहे, आंतरपीक म्हणून या दोन्ही शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि कडधान्ये पिकांची लागवड केली आहे. शेतकरी रतनपाल सांगतात की, यावेळी त्यांनी 10 हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे. याशिवाय त्यांनी अधिक नफ्यासाठी आंतरपीक घेतले आहे यात प्रामुख्याने भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश आहे. शेतकरी रतनपाल यांनी उसाच्या पिकात आंतरपिके म्हणून टोमॅटो, लसूण, कोबी, टरबूज, कारली, वांगी इ. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे.
मुख्य पिकात आंतरपीक घेऊन शेतकरी बांधव चांगला नफा मिळवू शकतात असे शेतकरी रतन पाल सांगतात. रतनपाल हे सर्व शेतकऱ्यांना मुख्य पिकात आंतरपीक घेऊन शेती करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की जर तुम्हाला पिकातून चांगला आणि दुप्पट नफा मिळवायचा असेल तर मुख्य पिकात आंतरपीक घेऊन शेती करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
याव्यतिरिक्त शेतकरी नागेंद्र, यांनी आपल्या शेतात उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून मूग, उडीद, बीट, कोबी, काशीफळ इत्यादींची लागवड केली आहे. आंतरपीक मधून या शेतकऱ्याला दर महिन्याला चांगली कमाई होत आहे. नागेंद्र सांगतात की, मुख्य पिकात आंतरपीकची लागवड करून शेती केल्यास जास्त पाणी लागत नाही, आणि दोन पिकातून नफा मिळतो. आंतरपीक शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि चांगला नफा मिळू शकतो. त्यांच्या या यशस्वी कार्यासाठी ऊस विकास विभागाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली होती.
संबंधित बातम्या:-
Published on: 31 March 2022, 05:57 IST