Success Stories

शेती व्यवसाय म्हटलं की बरीच तरुण पिढी ही नाक मुरडत असते. शेती ही एक तोट्याचा व्यवसाय आहे असा एक प्रकारचा समज बऱ्याच लोकांना आणि शेतकरी वर्गाला सुद्धा झाला आहे. बरेच लोक म्हणतात की शेतीतून काही चांगले उत्पन्न मिळत नाही सारख नुकसान बाजारभाव नाही परंतु या सर्व विचारांना छत्तीसगड च्या शेतकऱ्याने चुकीचे ठरवले आहे.

Updated on 05 October, 2021 8:23 AM IST

शेती व्यवसाय म्हटलं की बरीच तरुण पिढी ही नाक मुरडत असते. शेती ही एक तोट्याचा व्यवसाय आहे असा एक प्रकारचा समज बऱ्याच लोकांना आणि शेतकरी वर्गाला सुद्धा झाला आहे. बरेच लोक म्हणतात की शेतीतून काही चांगले उत्पन्न मिळत नाही सारख नुकसान बाजारभाव नाही परंतु या सर्व विचारांना छत्तीसगड च्या शेतकऱ्याने चुकीचे ठरवले आहे.

कधीच काही पिकणार नाही अशी माळरान जमीन निवडली:

छत्तीसगड च्या एका शेतकऱ्याने चक्क माळरानावर हिरवळ फुलवली आहे अनेक दिवस काबाडकष्ट करून त्याने हे सिद्ध सुद्धा केले आहे.छत्तीसगड राज्यातील मांडला जिल्ह्यातील सिंगारपूर या गावातील एका तरुणाने आणि येथील एक प्रगतशील शेतकरी(farmer)  संदीप लोहान यांनी माळरान असलेल्या नापीक जमिनीत चक्क  हिरवळ  पिकवून दाखवलेली आहे.12  वर्षांच्या आधी प्रगतशील शेतकरी संदीप लोहान यांनी शेतीसाठी(farming)  अशी जागा शोधली की जी जमीन  उग्र  आणि  नापीक होती. त्यात कधीच काही पिकणार नाही अशी माळरान जमीन निवडली. घेतलेली माळरान जमीन त्याने सपाट करून शेती करण्याचा ध्यास घेतला.

हेही वाचा:या शेतकऱ्याने झिरो बजेट दीड एकर शेतातून चार महिन्यात सुमारे तीन लाखांचे काढले उत्पन्न

संदीप लोहान यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि मेहनती वर 150 एकर खडबडीत माळरान जमीनित हिरवळ फुलवली आहे. परंतु,  अनेक  कृषी  तज्ज्ञांनी  या  जमिनीच्या  निवडीवर निराशा व्यक्त केली होती.परंतु संदीप लोहान यांनी न खचता शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि मेहनतीच्या जोरावर आज त्याच जमिनीत 500 हून अधिक लोक रोजगार  मिळाला  आहे. तसेच यातून पिकवलेली अनेक उत्पादने परदेशात सुद्धा पाठवली जातात.

प्रगतशील शेतकरी संदीप सध्या टोमॅटो, हिरवी मिरची आणि शिमला मिरची आणि वेगवेगळ्या पालेभाज्या विविध देश -विदेशात पाठवून करोडो  रुपयांची  उलाढाल  करून  बक्कळ  नफा कमावत आहेत.भाजीपाल्याबरोबरच त्यांनी आपल्या शेतात सफरचंद,लिंबू, पेरू अशी अनेक प्रकारच्या फळांची सुद्धा  लागवड करतात. तसेच कोरफड  सारख्या औषधी वनस्पती ची  सुद्धा लागवड करतात. त्याचबरोबर ते स्वतः रोप निर्मिती सुद्धा बक्कळ पैसे कमवत आहेत.

English Summary: Chhattisgarh farmers bring greenery to 150 acres of barren land, employing 500 people today
Published on: 05 October 2021, 08:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)