नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. आर्थिक चलन बंद असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे, दरम्यान कृषी क्षेत्राचे कामकाज चालू असल्याने अर्थव्यवस्थेला थोडा तरी आधार मिळाला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. कोरोनासारख्या अस्मानी संकटामुळे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु शेती करणारे किंवा शेतीशी जुडलेले युवकांना मात्र या काळात मोठी सुवर्णसंधी आहे. तर काही जणांना आर्थिक लाभही झाला आहे.
आज यशोगाथा मध्ये आम्ही अशाच एका शेतकऱ्यांची माहिती देणार आहोत ज्यांनी आपले नाव इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये दाखल केले आहे. ही कथा आहे अल्मोडा जिल्हातील राणीखेत येथील गोपाल उपरेती नावाच्या शेतकऱ्याची. गोपाल यांनी रोजगारासाठी हब असलेली दिल्ली सोडून शेती करण्याचा ध्येय्य हाती घेत गोपाल यांनी डोंगराळ भागात सफरचंद फळभाग घेण्यास सुरूवात केली. आपल्या बुद्धीचा वापर करत गोपाल यांनी अनेक शेतकऱ्यांपुढे आर्दश ठेवला. या शेतकऱ्याने ६ फुट १ इंच लांब कोथिंबीरचे उत्पादन घेत आपलं नाव इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये दाखल केले.
भारतातील सर्वात उंच कोथिंबरीचे पीक
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, जर शेतकरी कोथिंबिरीची चांगल्या प्रकारे लागवड करतो, तर साधरण ४ फुट उंची पर्यंतचे पीक येत असते. किंवा ४ फुट उंच कोथिंबरी वाढत असते. परंतु गोपाल उप्रेती यांनी लागवड केलेल्या कोथिंबिरीची उंची ६ फुट १ इंच आहे. विशेष म्हणजे हे सर्व सेंद्रिय शेतीमुळे झाले आहे. दरम्यान आतापर्यंत ५ फुट ११ इंच कोथिंबिरी वाढविण्याच विक्रम आधीच नोंदवला गेला आहे. गोपाल उप्रेती यांच्या शेती व्यवसायातून मोठी कमाई होते. एखाद्या नोकरीवाल्या पेक्षा अधिकचा पैसा गोपाल कमावत आहेत. सफरचंदच्या बागामधून गोपाल साधरण १ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
सेंद्रिय शेतीतून बदलले आयुष्य - सेंद्रिय शेतीतून बळीराजा चांगले उत्पन्न मिळवू शकतो. गोपाल उप्रेती यांच्या मते , देशातील शेतकरी गरीब आणि समस्यांमध्ये अडकलेला आहे. व्यवसायहून शेती केली तर बळीराजा गुणवत्तापुर्ण पिकांचे उत्पादन घेऊन थेट ग्राहकांना विकू शकतो. २०१६ पासून गोपाल हे सफरचंदचे बाग घेत आहेत. आपल्या गावात हाय डेंसिटी सफरचंदचे बाग ते काढत आहेत. यासह ते सेंद्रिय पद्धतीने लसून आणि मटर, कोबी, आणि मेथीचे उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय शेतीत खर्च कमी येत असतो. उत्पादन केलेल्या शेतमालातून येणारा नफा हा अधिक असतो.
सोर्स-
हिंदुस्थान समाचार
Published on: 15 May 2020, 04:09 IST