Success Stories

शेती क्षेत्रात योग्य नियोजन केले आणि कृषी विशेषज्ञांची मदत लागली तर शेतीमधून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेतीमध्ये बदलत्या काळानुसार मोठे बदल करावे लागतात. यासाठी कृषी विशेषज्ञांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरत असतो. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला देखील कृषि विशेषज्ञ यांचा सल्ला मोठा मोलाचा ठरला असून हा शेतकरी आता लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.

Updated on 31 March, 2022 10:51 PM IST

शेती क्षेत्रात योग्य नियोजन केले आणि कृषी विशेषज्ञांची मदत लागली तर शेतीमधून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेतीमध्ये बदलत्या काळानुसार मोठे बदल करावे लागतात. यासाठी कृषी विशेषज्ञांचा सल्ला  महत्त्वपूर्ण ठरत असतो. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला देखील कृषि विशेषज्ञ यांचा सल्ला मोठा मोलाचा ठरला असून हा शेतकरी आता लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नवयुवक शेतकरी अजय गावंडे यांनी कृषी विशेषज्ञ यांच्या सल्ल्याने केवळ दोन एकर क्षेत्रात कलिंगड व मिरची पिकाचे यशस्वी उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न कमविले. अजय यांनी कमी शेतीत देखील लाखोंचे उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून संपूर्ण देशात कुख्यात आहे. या जिल्ह्यात नेहमीच भीषण पाण्याची टंचाई भासत असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी नेहमी अशी शेती करण्यास प्राधान्य देतात ज्यात कमी पाणी वापरले लागतं असते.

जिल्ह्यातील पाणी टंचाईची बाब लक्षात घेऊन शेतकरी अजय यांनी कृषी तज्ज्ञ शैलेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हंगामी पिकाची माहिती घेतली. त्यांना कृषी तज्ञ शैलेश यांनी टरबूज अर्थात कलिंगड लागवडीची माहिती दिली.

कृषी तज्ज्ञांकडून कलिंगड लागवडीची माहिती घेतल्यानंतर अजय यांनी कठोर मेहनत घेऊन कलिंगडची लागवड केली आणि आज अजय चांगला नफा कमवत आहेत. कृषी तज्ञांच्या मते, इतर फळपिकांच्या तुलनेत टरबूज पिकाला कमी वेळ, कमी खत आणि कमी पाणी लागते यामुळे हे पीक दुष्काळी भागासाठी वरदान ठरू शकते. अजय यांनादेखील कलिंगड पिकाने तारले आहे.

अजय त्याच्या 2 एकर शेतीतून 60 मेट्रिक टन टरबूज उत्पादित करत असतात. कलिंगड पिकासमवेतच अजय 10 टन मिरचीचे देखील उत्पादन घेतो. अजय यांनी सांगितले की, टरबूज आणि मिरचीच्या लागवडीसाठी त्यांना सुमारे 2 लाख रुपये खर्च आला आणि आता या पिकातून त्यांना 8 ते 9 लाखांचा नफा प्राप्त झाला आहे.

पुढे बोलतांना अजय यांनी सांगितले की, त्यांनी कलिंगड लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला, यामुळे टरबूजाचा दर्जा खूप चांगला झाला आहे, आणि त्यामुळे त्यांच्या मालाची दुबईत निर्यात झाली आहे. एकंदरीत अजय यांनी कमी खर्चात सेंद्रिय पद्धतीने कलिंगड व मिरचीची शेती करून चांगला नफा कमविला व इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.

संबंधित बातम्या:-

8 वी पास महिला शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; ग्रामीण महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत

बापरे! एका आंब्याची किंमत पावणे तीन लाख रुपये; आंब्याला दिली जातेय हायटेक सेक्युरिटी

नोकरीच टेन्शन हवेतच विरणार!! शेतकरी पुत्रांनो 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला सधन

English Summary: By producing watermelon and chilli at low cost, farmer became a millionaire
Published on: 31 March 2022, 10:51 IST