Success Stories

पिकांचे भरघोस उत्पादनासाठी पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. जर आपण कीटकनाशक फवारणीचा विचार केला तर शेतकरी बांधवांच्या आरोग्यावर बरेच विपरीत परिणाम होतो. आपल्याला माहित आहेच कि कीटकनाशक फवारणी मध्ये जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर विषबाधेसारख्या समस्या देखील निर्माण होतात.

Updated on 17 October, 2022 4:08 PM IST

 पिकांचे भरघोस उत्पादनासाठी पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. जर आपण कीटकनाशक फवारणीचा विचार केला तर शेतकरी बांधवांच्या आरोग्यावर बरेच विपरीत परिणाम होतो. आपल्याला माहित आहेच कि कीटकनाशक फवारणी मध्ये जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर विषबाधेसारख्या समस्या देखील निर्माण होतात.

त्यामुळे शेतकरी बंधूंना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आशिष प्रताप राजपूत आणि त्यांची बहीण रजनी धनराज राजपूत  या भाऊ-बहिणीच्या जोडीने एक महत्त्वपूर्ण काम केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या महत्तम कार्यामुळे खूप फायदा होणार आहे.

नक्की वाचा:Rajgira Lagvad: शेतकरी बंधूंनो! या रब्बीत गहू आणि हरभरा सोबत मिश्रपीक म्हणून राजगिऱ्याची लागवड ठरेल शेतकऱ्यांसाठी फायद्याची, वाचा डिटेल्स

त्यांनी बनवला 'महाकृषी ड्रोन'

 जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा येथील आशिष प्रताप राजपूत व त्यांची बहीण रजनी राजपूत यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन तयार करून एक वेगळीच किमया साध्य केली आहे. आशिष व त्यांची बहीण रजनी हे दोघे भाऊ-बहिण उच्चशिक्षित असून आशिष त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या बहिणीने कम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.

 महाकृषी ड्रोन याची कल्पना कशी सुचली?

महाकृषी ड्रोनच्या कल्पनेबद्दल आशिष सांगतात की, लग्न समारंभामध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनवरून त्यांना औषध फवारणीसाठी देखील असा ड्रोन तयार करता येऊ शकतो, अशी कल्पना सुचली.

नक्की वाचा:क्रिषामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हा ड्रोन तयार करण्यासाठी त्यांना तीन लाख 50 हजार रुपये खर्च आला असून यामध्ये 11 लिटर क्षमतेची औषध साठवण टाकी बसवण्यात आली असून अवघ्या दहा मिनिटात हा ड्रोन एका एकर क्षेत्रावर औषध फवारणी करण्यास सक्षम आहे.

आशिष यांची इच्छा आहे की साडेतीन लाख रुपयांमध्ये हा ड्रोन तयार झाला आहे. परंतु येणाऱ्या भविष्यकाळात या पेक्षा स्वस्त ड्रोन कशा पद्धतीने तयार केला जाऊ शकतो यावर ते काम करत आहेत. याबद्दल बोलताना रजनीताई म्हणतात की, आम्ही देखील शेतकऱ्यांची लेक आहोत.

त्यामुळे शेतकरी बांधवांना शेती करताना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेमध्ये औषध फवारणी करता यावी व जीवाला देखील कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी हा कृषी महा ड्रोन तयार केला आहे. नक्कीच  या दोघा बंधू-भगिनीची ही कौतुकास्पद कामगिरी असून शेतकरी बंधूंना नक्कीच फायद्याची ठरू शकते.

नक्की वाचा:जाणून घ्या एकात्मिक कीड नियंत्रण आणि असा करा वापर खर्चही होईल कमी

English Summary: brothe and sister of pachora city make a krushi dron for insecticide sprey on crop
Published on: 17 October 2022, 04:08 IST