Success Stories

देशात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देताना दिसत आहेत (The traditional cropping pattern seems to be splitting) शेतकऱ्यांचा हा निर्णय मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील होताना बघायला मिळत आहे. पारंपरिक पीकपद्धतीत शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा खर्च करून देखील उत्पन्न मात्र नगण्यच मिळत असे, मात्र आता शेतकरी बांधव नगदी पिकांची तसेच फळबागांची लागवड करताना दिसत आहेत अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रुट सारख्या विदेशी फळांची लागवड (Cultivation of exotic fruits like dragon fruit) करताना देखील दिसत आहेत यातून त्यांना भलीमोठी कमाई देखील होताना नजरेस पडत आहे. ड्रॅगन फ्रुट लागवड करून कशी लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे घनसावंगी तालुक्यातील एका आदर्श शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. तालुक्यातील मौजे चिंचोली येथील रहिवासी भाऊसाहेब निवदे या आदर्श शेतकऱ्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पीकपद्धतीत मोठा आमूलाग्र बदल घडवुन आणला. या युवा शेतकऱ्याने यशस्वीरित्या ड्रॅगन फ्रुट लागवड करून अवघ्या दीड लाख रुपयांच्या खर्चात लाखो रुपयांची कमाई केली आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्याने अवघ्या 25 गुंठ्यांत ही किमया साधली त्यामुळे या युवा शेतकऱ्याचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

Updated on 06 January, 2022 11:42 AM IST

भाऊसाहेब यांनी पारंपारिक शेती वर चांगले अध्ययन केले असता त्यांच्या असे लक्षात आले की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या पीक पद्धतीतून कवडीमोल उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. पारंपरिक पीक पद्धतीतून पाहिजे तेवढी कमाई होत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले (Farmers are in debt) त्यांच्या नजरेला पडले शिवाय यामुळे शेतकऱ्यांना सावकारी कर्ज घ्यावे लागते आणि मग कर्ज फेडत फेडतच शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. या आपल्या अध्ययनातून धडा घेत भाऊसाहेब या युवा शेतकऱ्याने कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पीकपद्धतीत मोठा बदल करून काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने ड्रॅगन फ्रुटची लागवड (Cultivation of dragon fruit) करण्याचा विचार केला. भाऊसाहेब हे मोठे बुद्धिमान शेतकरी त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याआधी ड्रॅगन फ्रुट विषयी विस्तार मध्ये अध्ययन केले. त्यानंतर त्यांनी या औषधी फळांच्या लागवडीचा (Cultivation of medicinal fruits) निर्णय घेत मात्र 25 गुंठ्यांत प्रयोगारूपी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या ड्रॅगन फ्रुटच्या बागाना प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या तसेच त्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी इंटरनेटचा देखील उपयोग केला इंटरनेटवरून त्यांनी ड्रॅगन फ्रुट विषयी संपूर्ण माहिती आत्मसात केली. आणि मग हे विदेशी फळ लागवड केले. ड्रॅगन फ्रुट लागवडीत त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला, 25 गुंठ्यांत लावण्यात आलेल्या 2400 रोपांना त्यांनी सेंद्रिय खत वापरले. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवड देत त्यांना अत्यल्प खर्च आला, त्यांना 25 गुंठे यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे अवघे एक लाख 60 हजार रुपये खर्च आला. त्यांनी ड्रॅगन फ्रुट ची लागवड दहा बाय दोन या अंतरावर केली. ड्रॅगन फ्रुट च्या झाडांना आधार देण्यासाठी व नुकसानीचा धोका टाळण्यासाठी त्यांनी झाडाला बांबूचा आधार दिला.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ड्रॅगन फ्रुट निवडुंग अर्थात काटेरी वेल आहे. त्यामुळे या विदेशी फळाच्या झाडाला रानटी जनावरांपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही (There is no danger from wild animals), त्यामुळे या फळपिकाचे नुकसान हे जवळपास नगण्य असते. असे सांगितले जाते की ड्रॅगन फ्रुटचे उगमस्थानहे अमेरिका खंडात मध्य अमेरिका या प्रदेशात आहे. मात्र असे असले तरी आता ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन उष्ण प्रदेशातही घेतले जाते. यासाठी अनेक कृषी वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या फळबाग पिकात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे झाड वेलीवर्गीय असून ते अगदी पावसाच्या छत्रीसारखे वाढते त्यामुळे या झाडाला द्राक्ष फळबागांसारखा बांबूचा आधार (Bamboo base like a vine orchard to the tree) द्यावा लागतो. या झाडाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे झाड जवळपास तीस वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असते त्यामुळे या पिकातून दीर्घकालीन उत्पन्न शेतकरी बांधव प्राप्त करू शकतात. हे विदेशी फळ आपल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. या फळात मोठ्या प्रमाणात प्रोटीन कॅल्शिअम फॉस्फरस अनेक प्रकारची विटामिन्स आढळतात, त्यामुळे  या फळाचे सेवन मानवी आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असते या फळाचे सेवन केल्याने मधुमेह कोलेस्ट्रॉल संधिवात दमा कर्करोग डेंग्यू इत्यादी प्रकारच्या आजारात नियंत्रण प्राप्त करण्यास मदत होते. त्यामुळे या फळाची बारामाही मागणी असते, भाऊसाहेब या युवा शेतकऱ्याने  याच गोष्टीचा फायदा घेत ड्रॅगन फ्रुट लागवड केली आणि मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न अर्जित केले.

शेतकरी बांधवांनी शेती क्षेत्रात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे, तसेच आपण प्राप्त केलेला ज्ञानाचा शेतीसाठी उपयोग करणे महत्त्वाचे आहे. केवळ पारंपारिक पद्धतीने गाढवासारखे काबाडकष्ट करून चांगली कमाई केली जाऊ शकत नाही, तसेच यामुळे शेतकरी बांधव कधीच सधन होऊ शकत नाही. भाऊसाहेब या युवा आदर्श शेतकऱ्यांनी देखील आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून ड्रॅगन फ्रुट यशस्वीरित्या उत्पादित केले तसेच त्यांनी या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. भाऊसाहेब यांच्या मते येणाऱ्या काळात बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात मोठा असेल आणि यावर मात करण्यासाठी फक्त आणि फक्त शेतीच फायदेशीर ठरू शकते मात्र असे असले तरी पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या शेती पद्धतीत मोठा अमुलाग्र बदल घडवून आणावा लागेल.

शेतकरी बांधवांनी ड्रॅगन फ्रुट सारख्या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे कारण की आपल्या देशात शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि ड्रॅगन फ्रुट सारख्या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते विशेष म्हणजे यांसारखे पिक तीन ते चार महिन्यांपर्यंत बिना पाणी देखील वाढू शकतात. आदर्श शेतकरी भाऊ साहेब यांनी देखील या गोष्टीला हेरून घेतले आणि ड्रॅगन फ्रुट लागवड केली भाऊसाहेब यांनी या पिकातून पहिल्या वर्षी अडीच लाख रुपये दुसऱ्या वर्षी साडेसहा लाख रुपये तर तिसऱ्या वर्षी विक्रमी सहा लाखांचे उत्पन्न प्राप्त केले.

English Summary: bhausaheb earn 7 lakh rupees from 25 guntha dragon farmland
Published on: 06 January 2022, 11:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)