Success Stories

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद हे छोटस गाव येथील एक शेतकरी ते म्हणजे राहूल बन्सी पाटील यांना पहिल्यापासून शेतीची आवड आहे. मुळात आवड म्हणण्यापेक्षा यांचा कुटुंबाचा उदर्निवाह हा शेतीवरच म्हणावा लागेल. शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. अस समजून शेतीच आपली आवड अस समजणारे राहूल बन्सी पाटील. पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीचा जोड देणारे म्हणजेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेतीत यशस्वी प्रयोग करून आज अल्पकालीन पिकातून त्यांनी परिस्थीतीवर देखील मात केलीय. अगदी परिस्थितीला न घाबरता किंवा आलेल्या संकटाला न डगमगता एक यशस्वी शेतकरी म्हणून पाटील यांना पाहिल्या जाते. पाटील वयाच्या १६ वर्षांपासून शेती करत असून त्यांच्याकडे ४७ एकर शेतजमीन आहे.

Updated on 24 November, 2023 11:40 AM IST

प्रतिक्षा काकडे, कृषी जागरण पत्रकार

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद हे छोटस गाव येथील एक शेतकरी ते म्हणजे राहूल बन्सी पाटील यांना पहिल्यापासून शेतीची आवड आहे. मुळात आवड म्हणण्यापेक्षा यांचा कुटुंबाचा उदर्निवाह हा शेतीवरच म्हणावा लागेल. शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. अस समजून शेतीच आपली आवड अस समजणारे राहूल बन्सी पाटील. पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीचा जोड देणारे म्हणजेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेतीत यशस्वी प्रयोग करून आज अल्पकालीन पिकातून त्यांनी परिस्थीतीवर देखील मात केलीय. अगदी परिस्थितीला न घाबरता किंवा आलेल्या संकटाला न डगमगता एक यशस्वी शेतकरी म्हणून पाटील यांना पाहिल्या जाते. पाटील वयाच्या १६ वर्षांपासून शेती करत असून त्यांच्याकडे ४७ एकर शेतजमीन आहे.

विविध संकटांवर मात करून फळपिकांच्या शेतीत आपली ओळख त्यांनी तयार केलीय. केळी, मिरची,कलिंगड, खरबूज या पिकांबरोबरच पपई हे देखील त्यांचे अनेक वर्षांपासूनच पीक झालं आहे. शेतीचे यशस्वी होण्यासाठी फळबागांनी पाटील यांना मोठा आधार दिला. खानदेशात कापूस, केळीपाठोपाठ पपईचे पीकही शेतकरी जोमात घेतात. हे पीक तापी, गिरणा, पांझरा, वाघूर, सुसरी, गोमाई, भोकरी आदी नदीकाठच्या भागात जोमाने येते. नंदुरबार जिल्हा हा पपईचा महत्त्वाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात लागवड केल्यास या भागातील पपईवर त्याचा परिणाम जाणवतो. विषाणुजन्य रोगाचीही समस्या या पिकात जाणवते. अनेकवेळा दरही चांगले मिळत नाहीत. अशा विविध संकटांमुळे पीक सोडून देण्याची वेळ येते. केळीपेक्षा हे अधिक नाजूक पीक आहे. या सर्व परिस्थितीशी सामना करून नंदुरबार तालुक्यातील राहूल बन्सी पाटील हे एक यशस्वी शेतकरी म्हणुन ओळखले जातात.

खडतर प्रवासातून यशस्वी शेतकरी बनण्याची वाटचाल - 
२०२० मध्ये कोरोना सारख महामारीच संकट देशावर आलं. अगदी त्याच्या फटका सर्वसामान्यांपासून प्रत्येकालाच पाहायला मिळाला आहे. शेतकरी वर्ग देखील त्यामुळे अडचणीत आला होता. शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था यावेळी सर्वाना पाहायला मिळालीय. कोरोना मध्ये मार्केट नसल्याकारणाने व त्यासोबतच मार्केट जरी असलं तरी योग्य वेळेला माल विकला न केल्याने अनेक शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थीती झाली होती. माल घरात पडल्यामुळे खराब होऊन गेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत आर्थिक मानसिक फटका त्यावेळेला सहन करावा लागला. काही पैसा शेतासाठी लावला होता अगदी तोही भेटायला तयार नव्हता इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर कोरोना काळामध्ये आली होती.

यावेळी राहूल सांगतात की, आमच्या शेतात १८ एकर मिर्ची, १० एकर पपई, १४ एकर ऊस आणि आता कलिंगड आहे. यावेळी २५ मे ला मिर्ची लागवड केली होती. १५ ऑगस्टला कलिंगड लागवड केले होते. ११ एप्रिलला पपई लागवड केली. मिर्ची आणि कलिंगड मध्ये त्यांना आतापर्यंत कमीतकमी त्यांना ५३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळाल. अत्यंत वाईट परिस्थिती असताना न घाबरता परिवाराला सांभाळून पुन्हा हिमतीने प्रवास केलाय असा होता राहूल यांचा शेतीतील खडतर प्रवास जो त्यांनी आपल्या हिमतीने मेहनतीने सुखकर केला.

शेतकऱ्यांनी खचून न जाता घ्यावे अल्पकालीन पीक - 
राहूल सांगतात की, यावर्षी आम्ही बातम्यांच्या माध्यमातून पाहतो की यावर्षी सरासरीच्या ७० टक्के पाऊस कमी पडलाय. जितका पाऊस होतो तितका पाऊस यावर्षी झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने न घाबरता शेतकऱ्यांनी अल्पकालीन पीक घ्यावीत. २ महिन्याचे ३ महिन्याचे जास्त कालावधीतील पीके न घेता जसे की ऊस, केळी, कापूस, सोयाबीन ही पीके न घेता अल्पकालीन पीके घ्यावी जसे की कलिंगड, खरबूज,मिर्ची ही पीके ७० ते ८० दिवसात उत्पन्न देतात. त्यामुळे कमी पाण्यात जर उत्पन्न घ्यायचे असल तर शेतकऱ्यांनी अल्कालीन पीके घ्यावीत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विचार करून शेती केली तर निश्चित यशस्वी होऊ शकतात अस ते सांगतात. त्यासोबत शेतकऱ्यांनी फळ पीकाला जास्त पाणी लागत हा भ्रम काढून टाकावा. फळ पीके हे जरी पाण्याचे पीक असले तरी त्याला प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास खरबुज,टरबूज वेल जळुन जाण्याची भिती असते. वेलमृत अवस्थेत पडतो. फळ पिकांना जास्त पण नाही आणि कमी पण नाही हव तितकचं पाणी दिल्यास उत्तम दर्जाचे फळ पाहायला मिळते. व्हायरसला न घाबरता शेतकऱ्यांनी यावर आधुनिक पद्धतीचा वापर करून वेगळ्या पद्धतीने शेती करावी म्हणजे शेतकरी हा बिचारा न म्हणता यशस्वी शेतकरी म्हणला जाईल.

कुटुंबाची साथ, शेतीत प्रगती - 
राहूल यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असल्याने शेती लहानपणापासूनच बघत आणि राबत असल्याचा अनुभव, सध्याच्या प्रगत तंत्रज्ञान पद्धती यांचा वापर करून खडकाळ जमिनीवरून हिरवेगार शेत बहरताना आपल्याला दिसते. कुटुंबातील मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर व कुटुंबातील आईचे सहकार्य पत्नी आणि मुलांचे प्रेम यावर आज ही त्यांनी यशाची पायरी चढली आहे. संकट काळात कुटुंब सोबत असणे खुप गरजेचे असते. परिवारातील इतर सदस्यांचा आधार मिळणे देखील गरजेचे असते. असाच आधार राहूल यांना मिळाला. त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा परिवार त्यांच्यासोबत असल्याने ते आज यशस्वी शेतकरी आहेत असं ते गर्वाने सांगतात. तसंच योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी भरघोस उत्पादन देखील घेतलं आहे.

English Summary: Bet on hard situation from short term crop
Published on: 24 November 2023, 11:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)