Success Stories

राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाडा विदर्भ कोकणात कांदा लागवड बघायला मिळते. या रब्बी हंगामा देखील पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने आणि कांदा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळविला आहे. राज्यात या रब्बी हंगामात विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड केली असल्याचे सांगितले जात आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात विशेषता आष्टी तालुक्यात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लावला गेला आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून संकटांचा सामना करावा लागत आहे तसेच मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परंतु अडचणींची तमा न बाळगता कांदा उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करत असतो.

Updated on 31 January, 2022 11:06 AM IST

आष्टी तालुक्यातील एका अवलिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांने कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना देखील मोठ्या हिमतीने कांदा पिकाची लागवड केली आणि आपल्या कष्टाच्या जोरावर अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात विक्रमी कांद्याचे उत्पादन घेतले. या पठ्ठ्याने केवळ दहा गुंठे क्षेत्रात शंभर गोणी कांदा उत्पादित करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने अगदी अत्यल्प खर्चात कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असली तरी बीड सांगवी हे गाव तालुक्यातील इतर गावापेक्षा कांदा लागवडीत अग्रेसर आहे. याच मौजे बीड-सांगवीचे रहिवाशी शेतकरी शिवाजी लक्ष्मण मोहोळकर यांनी अत्यल्प खर्च करून अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात चार टन कांद्याची यशस्वी उत्पादन प्राप्त करण्याची किमया साधली आहे. 

शिवाजी यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या दहा गुंठे क्षेत्रात कांदा लागवडीचा निर्णय घेतला. कांदा लागवड केल्यानंतर शिवाजी यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून योग्य खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, कांदा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्याची गरज पूर्ण करून, कांदा पिकातून विक्रमी उत्पादन प्राप्त केले. शिवाजी यांनी कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत सुमारे 30 हजार रुपये उत्पादन खर्च आल्याचे सांगितले.

सध्या राज्यात कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे म्हणून शिवाजी यांना कांद्यातून सुमारे एक लाख रुपये उत्पन्न प्राप्त होण्याची आशा आहे. कांद्याला बेभरवशाचे पीक म्हणून शेतकरी बांधव संबोधतात कधी कांद्याचे बाजार भाव गगन भरारी घेतात तर कधी खूपच कमी होतात मात्र या प्रतिकूल परिस्थितीला मात देत कांदा उत्पादक शेतकरी मोठे दैदिप्यमान यश प्राप्त करतो. याचेच एक उत्तम उदाहरण शिवाजी यांनी प्रस्तुत केले आहे. मोहोळकर यांच्या मते त्यांच्या या दैदिप्यमान यशात कृषी विभागाचा खूप मोलाचा वाटा आहे. कृषी विभागाच्या अभूतपूर्व सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे तसेच असल्यामुळे शेती करणे खूपच सोपे झाले आहे.

English Summary: Avaliya farmer took "so much" record production in just ten guntas
Published on: 31 January 2022, 11:06 IST