शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहे, आसमानी तसेच सुलतानी संकटांमुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी पुत्रांना शेती ही निश्चितच तोट्याची असल्याची खात्री झाली आहे.
मात्र असे नसून शेतीही फायद्याची देखील सिद्ध होऊ शकते. हेच दाखवून दिले आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तडफदार नवयुवक शेतकऱ्याने. उस्मानाबाद जिल्ह्यातील तोरंबा तालुक्याचे सचिन सूर्यवंशी यांनी अवघ्या बारा गुंठे क्षेत्रातून स्ट्रॉबेरी लागवड करून तब्बल चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. अत्यंत जागेत अधिक उत्पन्न प्राप्त करता येऊ शकते हे सचिन यांनी दाखवून दिले आहे.
सचिन सूर्यवंशी मध्यंतरी काही दिवस पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. येथे वास्तव्यादरम्यान त्यांना स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. सचिन यांनादेखील स्ट्रॉबेरी लागवड करण्याचे ठरवले त्या अनुषंगाने त्यांनी साताराच्या त्यांच्या काही मित्रांकडून मार्गदर्शन घेतले आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तोरंबा सारख्या तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी करून दाखवली. सचिन सूर्यवंशी यांनी प्रायोगिक तत्त्वावर 12 गुंठे शेतजमीन स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. स्ट्रॉबेरीची लागवड महाबळेश्वर सारख्या थंड हवामानात अधिक प्रमाणात बघायला मिळते. असे असले तरी मराठवाड्यात देखील याची यशस्वी लागवड केली जाऊ शकते हे सचिन यांनी दाखवून दिले आहे. सचिन यांनी महाबळेश्वर पेक्षाही अधिक स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतल्याचे सांगितले जात आहे.
सचिन यांची स्ट्रॉबेरी सध्या उस्मानाबाद आणि सोलापूर बाजारपेठेत विक्री होत आहे त्यांच्या स्ट्रॉबेरीला अडीचशे रुपये प्रति किलोपर्यंत दर देखील मिळत आहे. यातून सचिन यांना सुमारे चार लाख रुपयांच्या उत्पन्नाची आशा आहे. सचिन यांचे हे नेत्रदीपक यश परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.
हे पण वाचा:-
मोठी बातमी: मक्याला हमीभावपेक्षा अधिक दर! काय आहे नेमके कारण?
Published on: 23 March 2022, 04:18 IST