अलीकडे देशातील शेतकरीपुत्र शेती पासून कोसो दूर चालले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात नुकसान सहन करावे लागतं असल्याने शेतकरी पुत्र शेती व्यवसायापासून दुरावत चालले आहेत. शेती म्हणजे फक्त तोटा अशीच मानसिकता आता शेतकरी पुत्रांच्या मनात तयार झाली आहे.
मात्र शेती व्यवसायात काळाच्या ओघात अमुलाग्र बदल केले तर निश्चितच शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. हेच दाखवून दिले आहे भोपाळ येथील एका परदेशात शिकलेल्या एका अवलिया सुशिक्षित युवकाने.
भोपाळच्या हर्षित गोथा या नवयुवकाने परदेशात शिक्षण घेतल्यावर शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने या नवयुवकाने एवोकॅडो फळाची शेती करण्याचे ठरवले. या शेतीतून हा नवयुवक अवलिया आजच्या घडीला लाखो रुपयांचे उत्पन्न कमवित आहे.
हर्षित यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडनची वारी केली. लंडन येथे त्यांनी BBA चे शिक्षण घेतले आहे. यादरम्यान हर्षित यांची एवोकॅडो या फळाशी विशेष संबंध आला कारण की हर्षित रोजच हे फळ खात असे. एके दिवशी असंच एवोकॅडो फळ खात असताना त्याने या फळाच्या पॉकेटकडे बघितले आणि त्याला समजलं की, हे फळ लंडन मध्ये उत्पादीत होतं नसून इजराईल मध्ये उत्पादीत होते.
महत्वाच्या बातम्या :
Business Idea : फक्त 10 हजारात सुरु करता येतो 'हा' व्यवसाय; कमाई होते लाखों रुपयात
मग मात्र हर्षितला या फळाची शेती करण्याची आवड निर्माण झाली. यादरम्यान त्याने इजराईल दौरा केला आणि तेथील एवोकॅडो उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. 2019 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षित मायदेशी परतला आणि मग एवोकॅडो शेतीची सुरवात त्याने केली. यासाठी त्याने इजराईल मधून आणलेली एवोकॅडोची रोपे शेतात लावली. एका एकरात त्याने या फळाची शेती सुरु केली. हर्षित याने 3 हजार रुपये प्रमाणे रोप आणली होती.
हर्षित आता जवळपास पाच एकरात याची शेती सुरु केली आहे. हर्षित एवोकॅडो रोपे तयार करून विक्री करत असून याच्या रोपाला आता परदेशात देखील मोठी मागणी आहे. निश्चितच हर्षित यांनी शेतीत केलेला हा बदल चांगला फायदेशीर ठरला असून इतर शेतकऱ्यांना यापासून प्रेरणा मिळणार आहे.
Published on: 05 May 2022, 03:46 IST