Success Stories

सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीर आठवते, त्याठिकाणी सफरचंद लागवडीसाठी योग्य हवामान आहे. आपल्याकडे याची लागवड करायची म्हटलं तर येड्यात काढतील, असे असताना मात्र आता पुण्यातील भोरमध्ये एक शेतकऱ्याने सफरचंद लागवड करून दाखवली आहे.

Updated on 11 November, 2022 3:58 PM IST

सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीर आठवते, त्याठिकाणी सफरचंद लागवडीसाठी योग्य हवामान आहे. आपल्याकडे याची लागवड करायची म्हटलं तर येड्यात काढतील, असे असताना मात्र आता पुण्यातील भोरमध्ये एक शेतकऱ्याने सफरचंद लागवड करून दाखवली आहे.

सफरचंदाची रोपे एका तरुण शेतकऱ्याने भोरच्या काळ्या मातीत लावली. त्यानंतर योग्य नियोजन करत खताची मत्रा दिल्याने आता या झाडांना फळे देखील लागली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

हा काळ्या मातीतील सफरचंदाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. संदीप शेटे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यानी दोन वर्षापूर्वी हिमाचल प्रदेश शिमला येथून हार्मोन ९९ या सफरचंद जातीच्या १५ रोपांची १५ बाय १५ अंतरावरती रोपांची लागवड केली होती.

या भन्नात आयडीयामुळे मिरचीच्या कीड व्यवस्थापनाची चिंताच मिटली आहे

आता ही झाडे चांगली तयार झाली आहेत. यामुळे याला बघायला देखील अनेक शेतकरी येत आहेत. या झाडांना संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवले गेले आहे. दुसऱ्या वर्षी झाडाची उंची सात ते आठ फूट झाली, त्यावेळी फळे घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यांना आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च झाला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू, शिमला येथे थंड हवेत येणारे सफरचंद भोरमध्ये यशस्वी करून दाखवली आहे. पुढील वर्षी 3 एकर जागेत सफरचंद लागवड करणार असल्याचे शेतकरी संदीप शेटे यांनी सांगितले.

जनावरांचे बाजार कधी सुरू होणार? पशुसंवर्धन विभागाने दिली महत्वाची माहिती

सध्या एका झाडाला ३० ते ४० सफरचंद आली आहेत. शेतकऱ्याच्या या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. तसेच अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांच्या शेतीला भेटी देखील देत आहेत.

महत्वाच्या बातम्या:
गुजरात निवडणुकीचा देशाला फायदा? पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..
8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण...
FRP: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच, आंदोलन पेटण्याची शक्यता

English Summary: Apples Kashmir now ripening Pune, maximum of Bhor farmer..
Published on: 11 November 2022, 03:58 IST