सध्या शेती म्हटली म्हणजे एक तोट्याचा व्यवसाय असे समीकरण बनत चालले आहे.त्यामागे कारणेही तशी भरपूर आहेत.हवामानातील प्रचंड झालेला बदल,कधी ओला दुष्काळ तर कधी दुष्काळत्यामुळे शेतात टाकलेले पिकहातात येईल याची कुठल्याच प्रकारचे शाश्वती राहिलेली नाही.
त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत महागाईने डोके वर काढल्यामुळे तसेचआरोग्यविषयक प्रश्न, मुलांचे शिक्षण इत्यादी गोष्टींवर खर्च आहे त्याप्रमाणे होतोच.या सगळ्या दुष्टचक्र मध्ये शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. परंतु अशा आव्हानात्मक परिस्थितीतवेगळा मार्ग शोधून शेतीच्या माध्यमातून आपले उत्पन्न कसे वाढेल त्यासाठी एका शेतकऱ्यानेभन्नाट मार्ग शोधून काढला आहे. त्या लेखामध्ये आपण त्या शेतकरी बंधूंची माहिती घेऊ.
चालता-फिरता हळद प्रक्रिया उद्योग
या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी वाशीम येथील शेतकरी शिवाजी कुरे यांनी चक्कर चालता-फिरता हळद प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.
शिवाजी कुरे यांनी आपल्या दुचाकीला हळद दळण्याची छोटी गिरणी जोडली आहे. या गिरणी च्या सहाय्याने ते त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेली हळद 160 रुपये किलो प्रमाणे दळून देतात. प्रति दिवशी साधारण 10 ते 50 ते 60 गिऱ्हाईक करत दिवसाला एक हजार ते दोन हजार रुपये कमावतात. याचा सगळा सरासरी हिशोब काढला तर महिन्याकाठी त्यांना लाख रुपये उत्पन्न मिळते असे त्यांनी सांगितले.
सध्या बाजारातील अनेक पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सगळ्यांमध्ये हळदीचा विचार केला तर यामध्ये पिवळ्या रंगाची भेसळ केलेली आढळते. परंतु शिवाजी कुरे यांनी ग्राहकांच्या समोरच कमी किमतीमध्ये ग्राहकांना हळद दळून मिळत असल्यामुळे त्याची विक्री चांगल्याप्रकारे होत आहे.
बाजारात मिळणाऱ्या हळदी ची किंमत ही 250 ते 300 रुपये किलो आहे. त्या तुलनेत कुरे यांच्याकडे मिळणारे हळद स्वस्त आणि चांगली असल्यामुळे ग्राहक ही हमखास विकत घेताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीत हात जोडून बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत तडजोड करून मार्ग शोधून प्रगती करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी कुरे हे होत. आपल्या दोन एकर शेतात हळदीचे पीक घेऊन स्वतः चालता-फिरता प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यांनी इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी मार्ग दाखवला आहे.
Published on: 07 November 2021, 01:33 IST