विदर्भातील बुलढाणा जिल्यातील चिखली तालुक्यातील कोनड खुर्द माझे गाव, बाबा व भाऊ हाडाचे शेतकरी सोयाबीन व तूर याला पर्याय म्हणून 2 एकरात 14 बाय 7 वर 870 झाडे केसर आंबा लागवड करण्यात आली.आंबा लावल्यावर यावर्षी आंबा उत्पादन घेण्यात आले परंतु आंबा विकण्यासाठी व्यापारी यांच्याशी संपर्क सुरू करण्यात आला,व्यापारी यांना आंब्याचे फोटो व 250 ते 350 ग्राम पर्यंत वजन असल्याने विडिओ पाठवण्यात आले, व्यापारी पण केसर आंबा निर्यात योग्य माल आहे सांगू लागले,बागेस भेट दिली व आंब्याचा माल कमी आहे व कमी भावात मागू लागले व गुजरात चा केसर आला या वर्षी आंबा खुप आला आहे भाव पडतील,आंबा व्यापारी हे छत्तीसगड झारखंड इकडील असून गोड बोलून शेतकरी विश्वास ठेवतात, मी सुद्धा माझ्या नोकरी च्या व्यापामुळे त्याला खुप विनंती केली की माल जर 2 दिवसात नाही तोडला तर झाडावर पिकेल हे दिनांक 7 मे ला व्यापारी बाग पाहताना मला व बाबांना सांगत होता
मग आम्ही पण त्याला विनंती करत होतो की तू उद्या आंबा तोड भावाचे नंतर पाहू पण तो म्हणाला माल कमी आहे वाहतूक साठी पुरणार नाही मी त्याला वाहतूक खर्च सुद्धा देतो पण आंबा उद्याच तोड पण त्याने ते मान्य केले नाही व ते निघून गेले , ते गेल्यावर बाबा मला म्हणाले 'आम्ही शेतकरी काही पण पिकवू पण आम्ही विकू शकत नाही" तू जो पर्यंत घरी आहे तो पर्यंत तू ही बाग व्यापारी याला देऊन टाक आम्ही कोठे जाणार आंबा विकायला बाबा आता तणावात होते.
हे ही वाचा - शेतकरी बांधवांनो शेतात युरियाचा वापर टाळा - पंतप्रधान
त्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता व मला पण वाटलं की मी उगाच पीक पध्दतीत बदल करून केसर आंबा लावला,पण मला माहित होते की आपल्या मालाचा दर्जा व गुणवत्ता चांगली असेल व थोडे मार्केट चा अभ्यास केला व तर आपण सुद्धा स्वतः विकू शकतो , मग मी माझा विचार आई बाबा व पत्नी ला सांगितला ते मला म्हणाले,तू ज्या पदावर नोकरी करत आहे ते तुला शोभणार नाही, लोक नाव ठेवतील ,मी म्हणालो आपल्या शेतातील माल विकायला काय लाज
व जर आपण केसर आंबा आपण व्यवस्थित बॉक्स मध्ये कच्चा केमिकल शिवाय व विषमुक्त कोणत्याही प्रक्रिया न करता झाडाचा तोडलेला व शेतात पॅकिंग करून दिला व लोकांना गुणवत्तचे खात्री दिल्यास आपण पण विकू शकतो, माझी सुट्टी रविवारी संपणार होती मग निर्णय मी घेतला व बॉक्स पण नव्हते व ते कसे पॅक करायचे आंबा कसा तोडायचे याचे पाहणी मी रसूलशेठ पैठण येथे जाऊन आलो त्याची विक्री व्यवस्थापन पाहिलं व त्यांनी व्यवस्तीत मार्गदर्शन केले ,बॉक्स मग मामाकडे डाळिंब चे 10 kg चे होते तेच वापरून मी ,माझी पत्नी व भाऊ,भावजय यांना आंबा कसा तोडायचा व पॅकिंग कसे करायचे सांगितले व नंतर आंबा तोडणे चालू केले ,व माझ्या कार मध्ये मी 140 किलो चे 14 बॉक्स आंबा आणला येताना माझ्याकडे फक्त 10 kg ची ऑर्डर होती मी रविवारी वणी त आलो,व हा केसर आंबा आमच्या शेतातील असून कोणत्याही प्रकारे प्रकिया न करता झाडाचा असून काही फोटो आमच्या बागेचे आंबा तोडतानाचे होते
त्याचे छोटे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन माझ्या मुलीने तयार केले व ते मोबाईल वर सांगितले बघता बघता सकाळी 11 पर्यंत सर्व बॉक्स हातोहात विकले व आंबा ची टेस्ट घेतल्यावर व लोकांच्या प्रतिक्रिया आल्यावर मला दुसऱ्या दिवशी 400 किलो ची ऑर्डर माझ्या पत्नी कडे आली मग मी गावाकडून ट्रॅव्हलवर बाबांनी व्यवस्तीत पॅकिंग करून आंबा पाठवला व तो सुद्धा आंबा आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला मान्य असण्याऱ्या भावात माझ्या पत्नी व मुलीने विकला,आता पर्यंत 1.12 टन आंबा आम्ही विकला .मी लिहणार नव्हतो पण आपण थोडी रिस्क घेतली व आपण स्वतः कोणतीच लाज ,लोक काय म्हणतात याचा विचार न केल्यास व आपल्या मालाची गुणवत्ता मध्ये तडजोड न केल्यास आपल्या मालाला व्यवस्थित भाव मिळतो. मला मी माझ्या बाबाच्या चेहऱ्यावर असणारा तणावाची जागा आता आनंदाने घेतली याचे समाधान होते .त्यांची मेहनतीचे चीज झाले होते व मला हे करणे गरजेचे होते कारण बाबाचा सुद्धा आत्मविश्वास कमी झाला असता तो कमी न होऊ देणं व एक चांगला ओरिजनल केसर आंबा (महाराष्ट्र शासनाच्या पिकवेल तो विकेल योजनेप्रमाणे )शेतकरी ते ग्राहक यांच्या पर्यन्त नैसर्गिक पद्धतीने केमिकल मुक्त व विषमुक्त कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता विकता आला व आंबा ज्यांनी घेतला त्यांच्या प्रतिक्रिया ह्या अनमोल होत्या त्यामुळे आपण घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता व पुढे natural निर्मल- सुरेख केसर आंबा या ब्रँड ने विकणार हा संकल्प केला आहे
रा- कोनड खुर्द
डाँ.शरद जावळे पाटील(उपजिल्हाधिकारी) ,यवतमाळ
9763817614
प्रतिनिधि - गोपाल उगले
Published on: 24 May 2022, 01:55 IST