आपण बघतो की समाजात अनेकजण असे असताना की ते समाजासाठी आपले जीवन वाहून टाकतात. ते कधीही स्वतःचा विचार करत नाहीत, यामुळे त्यांचे कौतुक केले जाते. आता कर्नाटकातील दासनादौडी गावातील ८५ वर्षांच्या साध्या धनगर मेंढपाळाने असेच काहीसे करून दाखवले आहे. के.रे. कामेगौडा असे त्यांचे नाव आहे. त्यांनी बकऱ्या चारता चारता एकाला एक जोडून 14 तलावांची साखळी निर्माण केली आणि एक नव्हे, दोन नव्हे तर 2000 वडाच्या झाडांची उभारणी केली आहे.
यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात मध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख केला. कामेगौडांची पण कहाणी जरा हटके आहे. कामेगौडा यांच्याकडे बकऱ्या आहेत. ते गेली 40 वर्ष या बकऱ्या चारण्याचे काम करतात. त्यांनी कुंदिनीबेट्टा या गावच्या हद्दीत पाण्याची कमतरता भासत असल्याने पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी कामाला सुरुवात केली, याबाबत त्यांनी कसलाही गाजावाजा केला नाही.
गेल्या 40 वर्षात त्यांनी 14 तलाव खोदले. आता हे 14 तलाव करताना त्यांना खर्चाचा प्रश्न उभा राहिला. यावेळी त्यांनी आपल्याकडील काही बकऱ्या विकल्या. त्या पैशातून अवजारे घेतली आणि त्यातून तलाव खोदायचे काम सुरू केले. सुरुवातीला काठीने, पहारीने तर नंतर औजाराने छोटे छोटे तलाव खोदले. त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि हळूहळू काहीजण त्यांच्या कामात सहभागी झाले.
धेनू अँप मधील पशुव्यवस्थापन विभाग ठरतोय पशुपालकांचा फॅमिली डॉक्टर, शेतकऱ्यांना दिलासा
यामुळे फक्त पाच वर्षात पुन्हा आठ तलाव खोदले गेले. हे तलाव लोकसहभागातून खोदले गेले आणि पाहता पाहता या भागात एकूण 14 तलाव खोदले. कामेगौडा आजही झोपडीत राहतात आणि आजही दिवसभर या तलावाची आणि झाडांचीच निगा राखतात. रात्री उशिरा ते घरी जातात. दिवसभर त्यांचं मन या तलावांमध्ये आणि झाडांमध्ये रमतं. वयाच्या 85 व्या वर्षी देखील ते हेच काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
जाता जाता महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी खुश..
मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवले, सोन्याच्या किमती वाढणार...
Published on: 04 July 2022, 01:44 IST