Success Stories

सोशियल मिडियामुळे अलीकडे माहितीची देवाणघेवाण करणे खुपच सोयीचे झाले आहे. यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्याची बातमी गल्लीपर्यंत पोहचायला उशीर लागतं नाही. एवढेच नाही तर युट्युब सारख्या माध्यमांमुळे कुठल्याही गोष्टीची माहिती सहजरीत्या उपलब्ध होत असते. मग ती शेती क्षेत्रातील का असेना! सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील युट्युब या माध्यमांचा प्रभावी वापर करत यशस्वी शेती करून दाखवली आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एका नवयुवक शेतकऱ्याने माळरान जमिनीत युट्युब व्हिडीओ बघत फळबागाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.

Updated on 15 March, 2022 9:55 AM IST

सोशियल मिडियामुळे अलीकडे माहितीची देवाणघेवाण करणे खुपच सोयीचे झाले आहे. यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्याची बातमी गल्लीपर्यंत पोहचायला उशीर लागतं नाही. एवढेच नाही तर युट्युब सारख्या माध्यमांमुळे कुठल्याही गोष्टीची माहिती सहजरीत्या उपलब्ध होत असते. मग ती शेती क्षेत्रातील का असेना! सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील युट्युब या माध्यमांचा प्रभावी वापर करत यशस्वी शेती करून दाखवली आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एका नवयुवक शेतकऱ्याने माळरान जमिनीत युट्युब व्हिडीओ बघत फळबागाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.

या नवयुवकाने सीताफळ आणि पेरूची यशस्वी लागवड केली आहे. या फळबाग पिकातून या नवयुवक शेतकऱ्यांने लाखो रुपयांचे उत्पन्न देखील प्राप्त केले आहे. आपल्या अपार कष्टांच्या जोरावर आणि योग्य नियोजनामुळे त्याने हे यश संपादन केले आहे. या युवा शेतकऱ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. युट्युब चा वापर करून या युवा शेतकऱ्याने मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा:-मानलं रावं! 'या' शेतकऱ्याने केवळ दोन महिन्यात कलिंगडच्या पिकातून कमविले लाखों रुपये; जाणुन घ्या

होटगी येथील युवा शेतकरी शिवराज कोरे याने युट्युब चा वापर करीत मुरमाड माती असलेल्या माळरान जमिनीत सीताफळ आणि पेरूची लागवड केली. त्याने एनएमके वन जातीच्या सीताफळाची लागवड केली, त्याअनुषंगाने त्याने सुरवातीला 340 सीताफळ रोपे लावलीत.

त्याला या बागेतून पहिल्याच वर्षी विक्रमी 1 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. बहार धरल्यानंतर पहिल्याच वर्षी चांगले विक्रमी उत्पन्न मिळाल्याने गदगद झालेल्या शिवराज यांनी परत दोन एकर क्षेत्रात सिताफळाची लागवड केली. सध्या शिवराज एकूण तीन एकर क्षेत्रावर सीताफळाचे उत्पादन घेत आहेत. म्हणजेच आजच्या घडीला शिवराज यांच्याकडे 1000 झाडे सीताफळांची आहेत.

हेही वाचा:-नौकरीने मारलं पण काळ्या आईने तारलं! बेरोजगार झालेला युवक आता शेतीतून प्राप्त करतोय लाखोंची कमाई

सीताफळ व्यतिरिक्त शिवराज यांनी एक एकर क्षेत्रावर पेरूची बाग देखील लावली आहे. ज्या माळरान मुरमाड जमिनीत कुसळ देखील उगवत नव्हते त्या ठिकाणी शिवराज यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करीत सीताफळ आणि पेरु ची बाग लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.

त्यांनी फळबाग पिकांसाठी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर करून हे यश प्राप्त केले असल्याचे सांगितले गेले. त्यांच्या या नेत्रदीपक यशात त्यांच्या मामाचे आणि कृषी सहाय्यक अधिकाऱ्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत सीताफळ आणि पेरू बागांसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी घट झाली आणि सहाजिकच उत्पादनात वाढ झाली. त्यांच्या सिताफळास साठ रुपये प्रति किलो ते 105 रुपये प्रति किलो दरम्यान बाजार भाव प्राप्त झाला. पेरू ला देखील सोलापूर बाजार पेठेत विक्रमी दर मिळाला त्यांचे पेरू सोलापूर बाजारात चाळीस रुपये प्रतिकिलो ते 60 रुपये प्रति किलो दराने विक्री झाले. एकंदरीत, शिवराज यांचे हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहे.

हेही वाचा:-गजब! फक्त वीस गुंठ्यात 'या' शेतकऱ्याने मिरची लागवड करून कमविले सात लाख रुपये

English Summary: After watching a YouTube video, this young farmer planted a custard apple orchard on the orchard; Now taking millions of products
Published on: 15 March 2022, 09:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)