सध्या कोरोना मुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत.शिक्षित तरुण असून पण मनासारखे वेतन नसल्यामुळे बरेच युवा नोकरी सोडून शेती व्यवसायात उतरून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.त्याने शिमला मिरची लावली कमीत कमी पाच एकर जमिनीत त्याने पाच लाख रुपये गुंतवले पण त्यातून १५ लाख रुपयांचं निव्वळ नफा काढला.
कोरोना काळात शोधला नवा मार्ग:
आजच्या परिस्थिती मध्ये किती तरी शिक्षण झाले तरी नोकरी मिळवणं आणि हे टिकवणं फारच अवघड झालेलं आहे. यामुळे शिकून सुद्धा तरुण शेतीमध्ये येऊन नवनवीन प्रयोग करून हजारो लाखो कमवत आहेत.तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या एका तरुणाबद्दल सांगणार आहोत की चक्क त्याने MBA चे शिक्षण पूर्ण केल्यावर शेती व्यवसाय प्राधान्य दिलं.
हेही वाचा:पहिली शिकलेली महिला करतेय पाच कोटींची उलाढाल; वाचा गुणाबाई सुतार यांची गाथा
तर या तरुण युवकाचे नाव हे शशांक भट्ट आहे. हा युवक उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ मधील एका छोट्याश्या गावचा आहे. 2013 साली त्याने त्याचे MBA चे शिक्षण पूर्ण केले.2013 नंतर त्याच्या हातात डिग्री होती परंतु त्याला नोकरी मिळत नव्हती नोकरी मिळाली पण अपेक्षे पेक्षा पगार खूपच कमी होता. त्याला नोकरी करावी का व्यवसाय करावा त्याने हे दोन्ही बाजूला ठेवून घरचीच शेती करायचे ठरवले. त्या तरुणांचा मामा हा एक प्रगतशील शेतकरी होता त्यामुळे त्याने अनुभवासाठी मामाकडे जाऊन कमीत कमीत सहा महिने शेती कशी करतात व कोणते पीक कधी घायचे हे चांगला पद्धतीने शिकला. नंतर जेव्हा शेती करायला तयार झाला तेव्हा त्याने बाजारपेठेचा चा अंदाज घेण्यासाठी काही दिवस लावले की लोकांची काय मागणी आहे यावर मोठा भर दिला.
त्याला सुरवातीपासूनच माहीत होतं की पारंपरिक शेती करणे खूप तोट्याचे असते. त्यामुळं शेतीत नवनवीन प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही हे देखील चांगलंच माहीत होतं.म्हणून त्याने सुरवाती पासूनच आधुनिक प्रकारे शेती करायला सुरुवात केली, पहिल्यांदा त्याने शेती मध्ये फळभाज्या,पालेभाज्या लावायला भर दिली.त्याने त्यामध्ये शिमला मिरची लावली कमीत कमी पाच एकर जमिनीत त्याने पाच लाख रुपये गुंतवले पण त्यातून १५ लाख रुपयांचं निव्वळ नफा काढला. आता त्याने फ्लॉवर लावला होता, २२ एकर जमिनीतून त्याला फ्लॉवर चे ४० लाख रुपये भेटले.आता त्याने आपल्या शेतामध्ये शिमला मिरची, वाटाणा फ्लॉवर तसेच काकडी लावले आहे. त्यामध्ये सुद्धा त्याला बक्कळ फायदा मिळेल असं त्यानं सांगितलं आहे.
Published on: 10 June 2021, 09:39 IST