अनेकजण आपल्याकडे चांगली शेती असताना देखील नोकरीच्या मागे लागतात, असे असताना मात्र काहीजण नोकरी सोडून असे काही करतात की कमी वेळेतच कोट्यावधी रुपये कमवतात. आता केरळमधील एका दाम्पत्याने सुपारीच्या पानापासून टेबलवेअर प्रोजेक्ट बनवत कोट्यावधी रुपये कमवून आपली हुशारकी सिध्द केली आहे. परदेशातील नोकरी सोडून भारतात सुरु केलेल्या या दांपत्याच्या व्यवसायाला आता चांगलेच यश आले आहे. यामुळे सध्या त्यांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की केरळमधील मदुकई गावातील देवकुमार नारायणन आणि पत्नी सारन्या यांनी दिल्ली विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर या दांपत्याने उज्वल भविष्याचा विचार करत संयुक्त अरब अमिरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या आधारावर ते 2014 साली परदेशात गेले. तेथे देवकुमारने बड्या टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली तर सारन्याने सिविल इंजिनिअर पदावर एका वॉटरप्रूफिंग कंपनीमध्ये काम सुरू केले.
असे असताना मात्र त्याचे पुर्ण लक्ष गावाकडे लागून होते. त्यांचे मन त्याठिकाणी रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर त्यांना नव्याने सर्व काही सुरु करावे लागणार होते. या दोघांच्या लक्षात आले की, आपण सुपारीच्या पानापासून काही तरी वेगळे करु शकतो. यावर जास्त विचार केल्यानंतर त्यांनी सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट बनविण्याचा निर्णय घेतला. आणि यामध्ये ते यशस्वी देखील झाले. पुढे काय होईल, यश मिळेल की नाही याचा विचार न करता त्यांनी यामध्ये सुरुवात केली.
सध्या त्यांच्या कंपनीची उलाढाल १८ कोटी रुपये असून भारतातील कित्येक तरुण आणि गरजू महिला कंपनीत काम करत आहेत. दांपत्याने सुरु केलेला सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट आज परदेशात देखील ओळखला जात आहे. त्यांनी यामध्ये अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पिशव्यापासून साबण पॅकेजिंग बनवण्यात येत आहे. कंपनीत सुपारीच्या पानांपासून वाट्या, चमचे, ताट, साबणाचे कव्हर आणि ओळखपत्र असे १८ प्रकारची उत्पादने बनवली जात आहेत. यामुळे आता ही कंपनी देश पातळीवर ओळखली जात आहे.
स्थानिक पातळीवर सुपारीला पाला म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कंपनीचे नाव 'पापला' असे ठेवण्यात आले आहे. पापला कंपनी कोणत्याही झाडाला इजा पोहचवत नाही. झाडाची सुपारीची पाने गळून पडल्यानंतर त्यापासून वेगवेगळी उत्पादने बनविण्यात येतात. यामुळे या जोडीचे कौतुक केले जात आहे. सध्या त्यांच्या या अनेक वस्तूंना मोठी मागणी असून त्यांना चांगले पैसे देखील मिळत आहेत.
Published on: 07 March 2022, 04:41 IST