सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे हे गाव करमाळा पासून 30 किमी वर आहे जे की उजनी धरणाचा बॅकवॉटर चा भाग त्यामध्ये येतो. पाण्याची मुबलकता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र अलिकडच्या काळात शेतकरी केळी उत्पादनाकडे ओळलेले आहेत. तर वाशिंबे येथील राजाभाऊ पाटील यांना प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाते.
केळी ठरला ‘टर्निंग पॉइंट :-
राजाभाऊ पाटील हे आपल्या शेतामध्ये ऊस व डाळिंब पिकांचे प्रयोग करायचे मात्र 2011 साली राजकारच्या काही गोष्टींमुळे त्यांचा जाणूनभुजून ऊस नेहला नाही. अगदी तेव्हापासून राजाभाऊ केळीकडे ओळले. जे की तेव्हापासून आज पर्यंत कधीच राजाभाऊनी उसाचे उत्पन्न घेतले नाही. राजाभाऊ १०-१२ वर्षांपासून केळी चे उत्पादन घेत आहे जे की ते विविध वाणांचे उत्पादन घेत असतात. खर तर कारखाण्यामुळे राजाभाऊच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉईंट मिळाला आहे.
हेही वाचा:-अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची
केळीची शेती :-
राजाभाऊंना 30 एकर शेती आहे. जे की ते केळीचे उत्पादन घेत असतातच मात्र त्यांनी सात ते आठ वर्षांपासून तमिळनाडू ला जाऊन रेड बनाना, वेलची इत्यादी केळीच्या वाणांची माहिती मिळवली. तसेच त्यांनी बाजारपेठेचा सुद्धा अभ्यास केला. या वाणांची केळी चवीला गोड आहेच मात्र त्या सोबतच औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती तसेच चयपचन शक्ती वाढवण्यास मदत होते. यामध्ये जीवनसत्व तसेच अँटीऑक्सिडंट चे प्राण देखील जास्त असल्यामुळे विविध आजारावर फायदेशीर ठरते. या वाणाच्या केळीला नेहमीच्या भावापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे.
हेही वाचा:-नाशिक मधील अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवला अल्पभूदारक शेतकऱ्यांसाठी रोबोट
रिटेल कंपनीकडून खरेदी :-
केळीच्या नवीन वानांना आपल्या भागाकडे जास्त प्रमाणात आवड दाखवली जात नाही जे की दक्षिण भारतात सर्वात जास्त या वाणांच्या केळीला मागणी आहे. २०१६ साली वेलची या वाणाच्या केळीचे त्यांनी पहिल्यांदा उत्पादन घेतले होते जे की रिलायन्स कंपनीला याची माहिती मिळाली होती. रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी केळीच्या बागेमध्ये आले आणि प्रति किलो 45 रुपये भाव दिला. जे की 150 टन केळी विकली गेली. हळूहळू अनेक रिटेल कंपन्यांना ही माहिती मिळू लागली जे की आत्ताच्या स्थितीला रिलायन्स, सह्याद्रीसह स्टार बझार, बिग बास्केट अशा नामवंत कंपन्यांना केळी पुरवली जाते. बागेमध्येच पाण्याने केळी धुतली जाते तसेच पोहचविण्याची सुदधा व्यवस्था केली जाते.
Published on: 09 September 2022, 09:47 IST