इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यानं वांग्याच्या शेतातून आर्थिक प्रगती साधली आहे. फक्त दहा गुंठे वांग्याच्या शेतातून शेतकरी लखपती झाला आहे. यामुळे सगळीकडे या शेतकऱ्याची चर्चा सुरु झाली आहे.
अविनाश कळंत्रे असे या युवा शेतकऱ्याचे नाव असून,इंदापूर तालुक्यातील तावशी येथील शेतकरी अविनाश कळंत्रे यांना २० गुंठे जमीन आहे. यामधील फक्त दहा गुंठ्यावर केलेल्या वांग्याच्या पिकातून अविनाथ कळंत्रे लखपती झाले आहेत.
कळंत्रे यांनी दहा गुंठे जमिनीवरती अजित १११ या वाणाच्या वांग्याची लागवड केली. वांग्याच्या दोन बेडमधील अंतर आठ फूट तर दोन झाडातील अंतर हे अडीच फूट ठेवले आहे.
तसेच गेली दहा महिने झाले त्यांच्या वांग्याचे उत्पादन सुरु आहे. त्यातून त्यांना जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. आतापर्यंत त्यांना २० टन उत्पन्न मिळालं आहे. तर अजून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पादन कळंत्रे यांना अपेक्षित आहे.
दरम्यान, आतापर्यंत वांग्याला त्यांचा एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे. इस्राइल पद्धतीनं त्यांना वांग्याची शेती करायची होती. परंतू नियोजनात फसगत झाल्यानं वांग्याचे पीक हे तब्बल १० ते १२ फुटापर्यंत वाढलं.
या आधी ऊसाची लागवड करीत होते. पंरतू त्यातून त्यांना काही हजारांचे उत्पादन मिळत होते. पण वांग्याची लागवड केली आणि कळंत्रे यांना चांगले दिवस आले. अशी माहिती शेतकरी अविनाश कळंत्रे यांनी दिली आहे.
विमा विम्याबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश
Published on: 04 October 2023, 04:46 IST