Success Stories

तुमच्या मध्ये जर एखादे काम करण्याची इच्छा असेल ना मग त्या वाटेवर किती जरी अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही न घाबरता ती गोष्ट साध्य करून दाखवता. आज अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आम्ही सांगणार आहोत. मागील काही वर्षांपूर्वी दिल्ली मध्ये रिक्षा चालवणारा व्यक्ती आज शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करत आहे.हरियाणा मधील यमुनानगर येथील दंगला या गावात धरमबिर कंबोज हे व्यक्ती राहत होते. धरमबीर १९८६ साली दिल्लीमध्ये रिक्षा चालवायचे. त्या साली ते कृषी विद्यापीठाच्या संपर्कात आले आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आधुनिक शेती बद्धल माहिती घेतली.

Updated on 01 November, 2021 5:38 PM IST

मशरूम शेती करण्यास चालू केले:

धरमबीर यांनी शेतीबद्धल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तसेच त्यांनी शेतीसाठी लागणारे प्रोसेसिंग मशीन सुद्धा तयार करण्याचे काम सुरू केले. धरमबीर  यांनी  सुरुवातीला  एका हलक्या वजनाचे स्प्रे तयार केले जे की ते एक स्प्रे मशीन होते.ते मशीन आपण आपल्या कमरेला लावून अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने स्प्रे करू शकतो. यानंतर त्यांनी मशरूम शेती करण्यास चालू केले. तेथील स्थानिक प्रशासनाने त्यांना यावेळी मदत करण्यास सुरू केले.धरमबीर यांनी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग केले. शेतीमध्ये रासायनिक खते कमी वापरात यावी म्हणून हर्बल फार्मिंगवर त्यांनी काम केले.

शेतीतून खूप लोकांना उपलब्ध करून दिला रोजगार:

धरमबीर हे शेती करत करत स्वतः नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकत होते. ते स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तेथील शेतकरी वर्गास भेट देऊन त्यांच्या सोबत शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग कसे करायचे याबद्धल संवाद साधायचे. धरमबीर यांनी त्यांच्या शेतात अनेक गरजू व्यक्तींना रोजगार सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे.त्यांच्या शेतामध्ये जवळपास २५ महिला काम करत आहेत,

एवढंच काय तर वर्षात त्यांनी १२० मशीन तयार केल्या आहेत. त्या मशीन ची किमंत ५५ हजार ते १ लाख ९० हजार पर्यंत जाते. आता धरमबीर प्रति वर्ष  १५ - २०  लाख  रूपये   कमवत आहेत. त्यांनी जे प्रोसेसिंग मशीन तयार केले आहे त्या माध्यमातून ते गुलाब, चेरी आणि खजूर यापासून अनेक गोष्टी तयार करत आहेत.

English Summary: A person used to drive a rickshaw a few years ago but now he is earning lakhs of rupees from agriculture
Published on: 01 November 2021, 05:37 IST