गेल्या 2 वर्ष्यात संपूर्ण जगावर कोरोना चे संकट आले होते त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले अश्या तरुणांनी गावाला जाऊन शेती करण्याचे ठरवले. आणि शेती करत करत शेती संलग्न व्यवसाय करायला सुरुवात केली. अश्याच एका अमरावती मधील तरुणाने कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर 4 हेक्टर क्षेत्रातून लाखो रुपयांच उत्पादन घेत आसपासच्या शेतकऱ्यांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे तसेच आव्हान सुद्धा उभ केलं आहे. त्यामुळे अमरावती मध्ये प्रत्येकाच्या तोंडी हेच नाव आहे.
बागायती शेती करून बक्कळ नफा:
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर गावातील किरण इंगळे या 24 वर्षीय मुलाने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापर कष्ट करण्याची तयारी याच्या हिमतीवर किरण ने 4 हेक्टर क्षेत्रातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या तरुणाने पारंपरिक शेती न करता बागायती शेती करून बक्कळ नफा मिळवू शकतो हे तेथील शेतकरी वर्गाला दाखवून दिले आहे त्यामुळे त्याचे उत्पन्न ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.किरण इंगळे ने आपले 12 वी पर्यंत चे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे न शिकण्याचा निर्णय घेतला आणि कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती करण्याचे ठरवले आणि पहिल्याच वर्षी किरण इंगळे या तरुणाने आपल्या 4 हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली.
वडिलोपार्जित मिळालेल्या शेतामध्ये किरण ने वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली. त्याने आपल्या शेतामध्ये टमाटर, वांगे, संत्रा,चवळी, मिरची,गोबी,कांदा अश्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. या मधून किरण ला आतापर्यंत १० लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे आणि यंदा च्या हंगामाला 20 लाखांचं उत्पन्न मिळेल असा अंदाज किरण ने व्यक्त केला आहे.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे किरण ला हे शक्य झाले आहे. 4 हेक्टर क्षेत्रातून किरण ने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भोवया उंचावल्या आहेत. तसेच सर्व शेतकरी वर्ग किरण चे कौतुक सुद्धा करत आहे. पारंपरिक शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून किरण ने हे शक्य केले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या समोर या 24 वर्षीय तरुणाने आदर्श निर्माण केला आहे.
तसेच इतर शेतकर्यांपेक्षा उत्तम पीक घेतल्याने अनेक शेतक-यांनी किरण च्या शेतामध्ये येऊन भेट देखील घेत आहेत. तसेच किरण ने शेतकरी वर्गाला आवाहन केले आहे की पारंपरिक शेती न करता शेतीमध्ये विविध प्रयोग करावेत आणि बागायती शेती करावी असे आवाहन केले आहे.
Published on: 18 February 2022, 08:04 IST