जुन्या लोकांना शेतामध्ये काम करण्याचा खूप छंद असतो. जुन्या लोकांना शेतीमध्ये वेगवेगळी कामे करण्यात खूप आनंद मिळत असतो त्यामुळे कोणत्याही वयाची अट न बघता म्हातारे लोक आवडीने शेती करत असतात. आज या लेखात आपण अश्याच एका आजीची प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत.मुर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील 84 वर्षीय आजी चांगलीच चर्चेत आली आहे. गोरेगाव मध्ये राहणारी 84 वर्षीय आजी अजून सुद्धा रानात काम करते हे ऐकल्यावर विश्वासच बसत नाही परंतु हे खरे आहे. एवढ्या वयात सुद्धा ही आजी रानात काबाडकष्ट करते हे विशेष च मानायला पाहिजे. या आजीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पारितोषिक देऊन सुद्धा 84 वर्षीय आजीचा गौरव करण्यात आला आहे.
5 एकर जमिनीवरून 30 एकर जमीन विकत घेतली:
या गोरेगाव मध्ये राहणाऱ्या 84 वर्षीय आजीचे वार्षिक उत्पन्न हे लाखो रुपये आहे शिवाय या आजीच्या घरी त्यांची मुले आणि नातवंडे यांचा समावेश आहे. या 84 वर्षीय आजीचं नाव हे मनकर्णाबाई रामराव डोईफोडे असे आहे.1972 साली मनकर्णाबाई यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मनकर्णाबाई यांच्या वाट्याला 5 एकर शेतजमीन आली होती. सुरुवातीपासून काबाडकष्ट करून शेतामध्ये काम केले आणि आपल्या मुलांना वाढवले. या काबाडकष्ट मधून त्यांनी 5 एकर जमिनीवरून 30 एकर जमीन विकत घेतली.
सुरवातीला या आजी आपल्या शेतामध्ये केळी, पपई अश्या पिकांचे उत्पन्न घ्यायची बहुतांशी हंगामी पिके च घेतली जायची. यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या जमिनीत हंगामी पीक सुद्धा पिकत न्हवती त्या जमिनीत या आजींनी केळी लागवड करून विक्रमी उत्पादन घेऊन लाखो रुपये कमावले आणि एक आदर्श निर्माण केला. सद्य: स्थितीत आजींच्या शेतामध्ये खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला या पिकांचे उत्पन्न घेतले जात होते.केळीच्या विक्रमी उत्पन्नांमुळे 2002 साली राज्य सरकारच्या कृषी विभागाने त्यांना नऊ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. 84 वय असून सुद्धा या आजीची दृष्टी आणि श्रवणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे शिवाय अतिषयक काटक असे शरीर असल्यामुळे 84 वय असून सुद्धा आजी शेतामध्ये दिवसभर काम करतात.
एका सत्कारादारम्यान आजी ने सांगितले की पती गेल्यानंतर अचानक त्यांच्यावर भले मोठे संकट ओढवले मूल लहान होती अतिषयक कठीण आणि बिकट परिस्थिती वर मात करून आजीने हे सारे वैभव उभारले आहे. नवऱ्याच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर शेतीत काबाडकष्ट करण्यास स्वतःला झोकून दिले. तेव्हा फक्त ५ एकर शेती माझ्याकडे होती, आता ३० एकर आहे. मजुरांकडून काम करून घेत असताना स्वतःही त्यांच्याबरोबर काम करते. आजसुद्धा आजी एक एकर क्षेत्रातून १५ क्विंटल उत्पन्न घेते. खरचं कष्टाला पर्याय नाही यातून समजले.
Published on: 06 April 2022, 12:37 IST