Success Stories

बंगळुरू: उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात लोक पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. गायी-म्हैशीचे दूध आणि त्याचे उपपदार्थ विकून अनेक पैसे कमावत असतात. तर काहीजण दुधासह शेणापासून बनवलेले सेंद्रिय खतही तसेच गोमूत्र विकून पैसे मिळवत असतात. पण आज आम्ही अशा एका अभियंता(इंजिनिअर) विषयी सांगणार आहोत जो आई-वडिलांसोबत एक डेअरी फार्म चालवत आहे.

Updated on 06 November, 2021 12:39 PM IST

बंगळुरू: उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात लोक पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. गायी-म्हैशीचे दूध आणि त्याचे उपपदार्थ विकून अनेक पैसे कमावत असतात. तर काहीजण दुधासह शेणापासून बनवलेले सेंद्रिय खतही तसेच गोमूत्र विकून पैसे मिळवत असतात. पण आज आम्ही अशा एका अभियंता(इंजिनिअर) विषयी सांगणार आहोत जो आई-वडिलांसोबत एक डेअरी फार्म चालवत आहे.

तुम्ही म्हणाल यात काय विशेष, थांबा, खरी गंमत पुढे आहे. या 26 वर्षीय मुलाने कॉपोर्टेमधील नोकरी सोडून डेअरी चालू केली आहे. या डेअरीतून मिळणारं दूध, शेणखत, गो-मूत्र, याशिवाय हा इंजिनिअर गायींना अंघोळ घातलेल्या पाण्यातूनही पैसा कमावत आहे. हो अगदी तेच गायींना अंघोळ घातल्यानंतर गोठ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यातून इंजिनिअर पैसा कमावत आहे.

या मुलाचे नाव आहे, जयगुरू अचर हिंदर. हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंद्रू गावचा रहिवाशी आहे. जयगुरुने विवेकानंद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर एका खासगी कंपनीत जयगुरूने नोकरीही केली. एक वर्ष नोकरी केल्यानंतर जयगुरू त्या ९ ते १० ची वेळ असलेल्या नोकऱीला कंटाळला. याच कारण होतं, त्याला नोकरीपेक्षा शेती आणि गायीं पालन करणं अधिक आवडत होतं. त्याला आपल्या वडिलांच्या शेतात आणि गायींसोबत वेळ घालवणे नेहमी आवडत असायचं. त्याने 2019 मध्ये एके दिवशी महिन्याला ठोक रक्कम देणारी नोकरी सोडून वडिलांसोबत शेती आणि गायींचे पालन करण्याचे ठरवले. जयगुरू यांच्याकडे दहा गायी आहेत, त्यांनी या कामाला पारंपारिक पद्धतीने न करता यात नवीन तंत्रज्ञान वापरत लाखो रुपयांची कमाई सुरू केली.

 

"मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्याचा आणि उत्पन्न वाढवण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग वापरण्याचा विचार करत होतो. हे सर्व कल्पना नंतर व्यावहारिक निर्णयांमध्ये उपयुक्त ठरली," अचर सांगतात. अचर पुढे सांगताना म्हणाले की, डेअरी आता खूप चांगल्या प्रकारे विस्तारली गेली आहे आणि स्थापित झाली आहे. गुरांची संख्या 130 पर्यंत वाढली आहे आणि कुटुंबाकडे 10 एकर शेतीदेखील आहे जेथे सुपारी हे मुख्य पीक आहे. अचर यांनी फार्म डेअरीमध्ये काही नवनवीन शोध आणले, ज्यामुळे कुटुंबाला महिन्याला 10 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळत आहे.

कोरडे शेणखत

पारंपारिक डेअरी व्यवसायात नवीन काय करावं या विचार असताना अचर यांनी इंटरनेटवर संशोधन सुरू केला. वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. मग काही तासांच्या संशोधनानंतर त्यांना शेण कोरडे करण्याच्या एका मशीनचा शोध लागला. ही मशीन घेण्यासाठी त्यांनी पंजाबमधील पटियाला जाण्याचा निर्णय़ घेत तेथून ही मशीन आणली. या मशीनच्या माध्यमातून अचर हे शेण कोरडे करतात. दर महिन्याला या कोरड्या शेणखताच्या 1 हजार पोती विकल्या जातात. आजूबाजूचे आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी त्याच्याकडून हे शेणखत मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

Cow Dung Slurry शेणाची मळी

गाईचे शेण, गोमूत्र आणि गायींना आंघोळ केल्यावर जमा होणारे पाणी यांचे मिश्रण म्हणजे स्लरी. हे पाणी साठवून टँकरने वाहून नेले जाते. अचर यांच्या मालकीचा एक टँकर आहे ज्यामध्ये 7,000 लिटर मळी आहे. अचर हे दररोज या मळीचा एक टँकर विकतात. साधरण 8 ते 11 रुपये प्रति लिटर प्रमाणे स्लरी विकली जाते. ही स्लरी म्हणजेच मळी पिकांच्या मुळाशी टाकले जाते. आता खरेदाराला माहिती असते कि एका झाडाला किती प्रमाणात शेण-गोमूत्राची मिश्रण घालायचं. त्यानुसार ते ही स्लरी विकत घेत असतात.

Gonandajala (From the dead cow) गोनंदजल मेलेल्या गायींपासून बनवलेलं पाणी

डेअरी विषयात अभ्यास करताना अचर यांना एक अगळी-वेगळी गंमत समजली ती म्हणजे गोनंदजल. इंटरनेटनर खूप अभ्यास केल्यानंतर अचर यांना याविषयी माहिती मिळाली. हे पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असे पोषक द्रवपदार्थ आहे जे पिकांच्या वाढीस चालना देते.
गाय मेल्यानंतर, प्रेत जाळण्याऐवजी किंवा दफन करण्याऐवजी, ते गोमूत्र, ताक, आणि इतर अनेक वस्तू आणि पाणी यांच्या मोजणीच्या प्रमाणात एका मोठ्या टाकीत सोडले जाते. या घटकांचे विघटन करण्यासाठी 6 ते 7 महिन्यांसाठी एका टाकीत बंद केले जाते. पुरेसा कालावधी होई पर्यंत हे उघडले जात नाही, सात महिन्यानंतर हे द्रवपदार्थ द्रव खत म्हणून वापरले जाते. सुमारे 100 लिटर पाण्यात हा द्रव 1.5 लिटरप्रमाणे मिसळून खत म्हणून वापरले जाते.

 

याच्या वापराने लोकांनी पिकांवर चांगले परिणाम पाहिले आहेत, अचर सांगतात. याशिवाय, ते दररोज 750 लिटर दूध आणि मासिक 30 ते 40 किलो तूप विकतो. “या सर्व कामात आम्हाला मदत करण्यासाठी आमच्याकडे सुमारे 10 कर्मचारी आहेत. आमच्याकडे दूध काढण्याचे यंत्र यांसारखी अनेक यंत्रे आहेत जी मजुरांवरचा भार कमी करतात आणि गोठ्यात पाण्याची चांगली सोय आहे ज्यामुळे शेड साफ करण्यात जास्त वेळ घालवावा लागत नाही. असे छोटे पण प्रभावी बदल उत्पादकता वाढवतात” "उत्पादनांची संपूर्ण सेंद्रिय श्रेणी दिल्याने आपला महसूल तर वाढतोच, शिवाय आपण पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाही याचे समाधानही आपल्याला मिळते," असेही ते म्हणाले.

नजीकच्या काळात दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी युनिट स्थापन करण्याचा त्यांचा विचार आहे. “सरकारच्या विविध सबसिडी आणि स्टार्टअप कर्ज आणि फायदे यामुळे नवीन प्रकल्प हाती घेण्यात खूप मदत झाली आहे. या कामात कोणतीच साप्ताहिक सुट्टी नाही आहे, हे मला माहित आहे. परंतु मला हे देखील माहित आहे की काही वर्षांच्या कालावधीत, हे पूर्णपणे स्वावलंबी होईल आणि सेटअप जास्त प्रयत्न न करता चालेल. आणि कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा, आपला स्वतःचा बॉस असणे ही सर्वात मोठी भावना असते ”, असेही अचर म्हणतो.

English Summary: 26-yr-old civil engineer quits corporate job to sell cow dung, milk; earns millions
Published on: 06 November 2021, 12:39 IST