पशुपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यातून लाखो रुपये कमविले जाऊ शकतात, असे म्हणण्यापेक्षा अनेक लोक यातून लाखो रुपये कमवीत आहेत. मित्रांनो यशाला कुठलाच शॉर्टकट नसतो, यश संपादन करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत घ्यावी लागते, आणि एकदा यश मिळायला सुरवात झाली की मग ते ना जात बघते ना लिंग. मेहनत करून कोणीही यशस्वी होऊ शकतो मग तो वयाने छोटा असो की मोठा आणि स्त्री असो का पुरुष.
यशाची अशीच एक कहाणी आहे 21 वर्षीय श्रद्धाची. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि साखर कारखान्याचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यापासुन जवळपास 60 किलोमीटर दुर निघोज गावातील रहिवासी श्रद्धा धवन आपला वडिलोपार्जित डेअरी फार्म चालवीते आणि त्यातून महिन्याला 6 लाख रुपये कमवीत आहे.
वडिलांचा डेअरी फार्ममध्ये काम चालू केले
श्रद्धा ह्यांच्या वडिलांचा, सत्यवानचा एक डेअरी फार्म आहे. श्रद्धा सांगते की,1998 मध्ये त्यांच्या वडिलांच्या डेअरी फार्म मध्ये केवळ एक म्हैस होती. त्या काळात त्यांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय म्हैस पालन हा होता. सत्यवान यांना दुध विक्री करणे हे कठीण होते कारण की ते विकलांग आहेत. खरे परिवर्तन हे 2011 मध्ये आले जेव्हा सत्यवान यांनी श्रद्धाला आपल्या डेअरी फार्मची जबाबदारी सोपवली.
श्रद्धाने सांगितले की, तिचा भाऊ तेव्हा खुप लहान होता, आणि वडील बाईक चालवू शकत नव्हते, त्यामुळे फक्त 11 वर्षाची असताना श्रद्धाने डेअरी फार्मची जबाबदारी उचलली.
श्रद्धाला हे सुरवातीच्या काळात थोडं विचित्र वाटले आणि साहसी देखील, कारण की तिच्या गावात ह्याआधी मुलींनी कधीच असे काम केले नव्हते.
श्रद्धाने शिक्षणाबरोबर केला हा व्यवसाय
श्रद्धाने आपल्या शिक्षणाबरोबर आपल्या वडिलांचा डेअरी फार्म चालवीला. 2015 मध्ये दहावीची बोर्डाची परीक्षा असताना देखील श्रद्धा दुध विकायला जात असायची. श्रद्धा यांनी फिजिक्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तिने 2020 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि आता मास्टर्स करत आहे.
महिन्याकाठी 6 लाख कमविते
सध्या श्रद्धाच्या डेअरी फार्ममध्ये 80 म्हशी आहेत. आणि दिवसाला सुमारे 450 लिटर दूध त्यांना विक्रीसाठी उपलब्ध होते.
आणि यातून श्रद्धा जवळपास महिन्याला सहा लाख रुपयांची कमाई करते. श्रद्धा म्हणते, “2019 मध्ये, त्यांनी आपल्या म्हशीसाठी दुसरा मजला बांधला. अशाप्रकारे तिने शिक्षण करत हळूहळू या व्यवसायातील बारकावे समजले आणि मर्यादित साधनांचा वापर करूनही व्यवसायातील चढ-उतार किंवा पोकळी कशी भरून काढता येईल हे जगाला दाखवून दिले.
Published on: 22 November 2021, 06:04 IST