PM Kisan Scheme : काय सांगता तुमच्या खात्यात पैसा नाही आला; 'या' चुकीमुळे तुमचे खाते आहे रिकामे

07 June 2020 03:36 PM By: भरत भास्कर जाधव


जर आपण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहात आणि आपले नाव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सरकार द्वारा पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून किंवा काही महिन्यांपासून बँक खात्यात पैसे येत नाहीत. अशी स्थिती प्रत्येकजण अनुभवत आहात का मग काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे सहज येतील, आणि पैसे का येत नव्हते याचे उत्तरही आपल्याला कळेल.

जर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ नाही मिळाला असेल तर आपल्या आधार कार्ड किंवा बँक अकाउंट आणि इतर कागदावर नावाची स्पेलिंगमध्ये अंतर असेल किंवा चुकी असेल. नावात चुकी असल्यामुळे बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

जर असे काही असेल त्या चुका दुरुस्त करा. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जा. यात फार्मर कॉनरच्या आत जाऊन Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा.  येथे आपला आधार नंबर टाका.  यानंतर एक कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकी आहेचा म्हणजेच अर्जावरीत आणि आधारवर आपले नाव वेगवेगळे आहे. ते हे आपण ऑनलाईनने घरी बसून निट करू शकतो. जर अजून दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा.

जर हप्ता कपात होऊन आला तर काय परत मिळेल

जर कोणत्या शेतकऱ्याचा चालू हप्ता मिळालेला नाही. अर्जात काही तुटी असल्यास आणि तुटी आपण दुरुस्त केल्यास आपल्याला पैसे मिळतात. याविषयी माहिती स्वत सरकारने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. (https://pmkisan.gov.in/Documents/RevisedFAQ.pdf)

या स्पष्ट सांगण्यात आले आहे की, लाभार्थ्याचे नाव  पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु कोणत्या तरी कारणामुळे ते चार महिन्यापासून हप्ता येत नाही. तर सदर तुटी दूर केल्यास लाभार्थ्याला पैसे मिळतील.  जर अर्ज केला तरी पैसे मिळत नसतील तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 (Toll Free) वर संपर्क करावा. येथेही आपली तक्रार ऐकली जात नसेल तर आपण मंत्रालयाच्या दुसऱ्यानंबरवर  (011-23381092) यावर संपर्क करावा. 

pm kisan scheme पीएम-किसान पीएम किसान लाभार्थी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी PM-Kisan scheme PM-Kisan beneficieries
English Summary: You didn’t get money of pm kisan scheme; solve these problem and get money in your account

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.