1. इतर बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ; ३१ मार्च २०२३ पर्यंत घेऊ शकणार PMVVY चा लाभ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारची ही योजना नागरिकांना त्यांच्या म्हातारपणात आधार देणारी योजना आहे. या योजनेंतर्गंत आपल्याला पेन्शन मिळते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारची ही योजना नागरिकांना त्यांच्या म्हातारपणात आधार देणारी योजना आहे. या योजनेंतर्गंत आपल्याला पेन्शन मिळते. भारतीय ग्राहक आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला LIC एकरकमी रक्कम देऊन त्यांचे ग्राहक दरमहा निवृत्तीवेतनाची रक्कम मिळवू शकतात. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत PMVVY चा कालावधी ३१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेची पात्रता (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)

PMVVY म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ घेणारी व्यक्तीचे वय ६० वर्ष असावे. ६० वर्ष वय असलेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. गुंतवणूक करण्याची कोणतीच मर्यादा नसून ग्राहक या योजनेतून जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील.या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एलआयसी कार्यालयात आपणांस अर्ज मिळेल. दरम्यान ३१ मार्च २०२० पर्यंत या योजनेत नोंदणी करता येणार आहे. यामुळे आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. एलआयसी कार्यालयातून अर्ज घेऊन त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.

ग्राहकांना पीएमव्हीव्हीवाय (PMVVY ) योजनेत गुंतवणूकीसाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे -

  • रहिवाशी दाखला
  • पॅनकार्ड
  • धनादेश चेकची एक प्रिंट
  • बँकेचे पासबुक

या योजनेतेर्गंत आपण कमीत कमी १ हजार आणि जास्तीत जास्त १० हजार रुपयांचे पेन्शन मिळवू शकता. जर ग्राहकांना एक हजार रुपयाचे पेन्शन हवे असेल तर त्यांना १ लाख ५० हजार रुपये जमा करावे लागतील. जर १० हजार रुपये पेन्शन हवे असतील तर ग्राहकांना १५ हजार रुपये जमा करावे लागतील.

English Summary: union cabinate's big decision on PMVVY , people can get benefit this scheme still 31 march 2023 Published on: 21 May 2020, 06:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters