मुलींसाठी फायदेशीर आहे ही योजना ; म्युच्युरिटीनंतर मिळतात लाखो रुपये

05 September 2020 02:31 PM By: भरत भास्कर जाधव


देशातील मुलीचे भविष्य सुधारण्यासाठी सरकार विविध योजना राबवते.  पोस्ट कार्यालयाने मुलींसाठी एक योजना आणली आहे, ही योजना सुकन्या समुद्धी  योजना.  टपाल कार्यालयाची ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे.  या योजनेतून मुलींचे शिक्षण ते लग्नापर्यंत आर्थिक मदत मिळते. वार्षिक गुंतवणूक करुन चांगला परतावा या योजनेतून मिळत सतो. सुकन्या योजनेच्या अंतर्गत टपाल कार्यालयात  किंवा कमर्शिय बँकेत खाते उघडू शकतो. यात ७.६  टक्के व्याज मिळते.  या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे  मॅच्युरिटी ही २१ वर्षाची आहे म्हणजे गुंतवणूक फक्त १४ वर्षासाठी करावी लागते.

सुकन्या समुद्धी योजना मध्ये १.५० लाख रुपये जमा करावी लागतात. जर  आपण महिन्याला हप्ता देणार असाल तर आपल्याला  प्रत्येत महिन्यासाठी १२ हजार ५०० रुपये द्यावे लागतील. योजनेच्या अंतर्गत  अर्ज करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षापेक्षा कमी असावे लागते.   एक परिवारात दोन्ही मुलींच्या नावाने खाते उघडू शकतो. जर दोन पेक्षा जास्त मुली असतील तर खाते उघडण्यासाठी  जन्म प्रमाणपत्रासह एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. या योजनेचा लाभ घेतल्यास आपल्याला  आयकर कायदा धारा  ८० सी अंतर्गत आयकर पासून सुट मिळते.  सुकन्या समुद्धी योजनेत किमान  २५० रुपये जमा करावी लागतात.  मुलीचे वय साधरण १८ वर्ष झाल्यानंतर  शिक्षण किंवा लग्नासाठी जमा करण्यात आलेल्या रक्कमेतून ५० टक्के रक्कम आपण काढू शकतो.

सुकन्या समुद्धी  योजनेसाठी  अर्ज करण्याची प्रक्रिया - Process for applying for Sukanya Samrudhi Yojana 

या योजनेत अर्ज करण्यासाठी   जवळील पोस्ट कार्यालयात संपर्क करावे.  येथे योजनेचा अर्ज करावा.  आता  यात माता - पिता आपल्या मुलीचे नाव लिहावे. यासह अधिक महत्त्वाची माहिती भरावी. अर्ज भरल्यानंतर ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, आधार कार्ड, मुलीचे नावजन्म प्रमाण पत्र, फोटो इत्यादी कागदपत्र  खाते उघडण्यासाठी लागतात.  दरम्यान सुकन्या समुद्धी योजनेच्या अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपये १४ वर्षापर्यंत जमा करतात तर एकूण २१ लाख रुपयांपर्यतची रक्कम जमा होतात.  यावर ७.६ टक्के व्याज दिले जाते. व्याज मिळून ३७ लाख ९८ हजार २२५ रुपये इतकी रक्कम जमा होते.  यानंतर ७ वर्षापर्यंत या रक्कमेवर अजून व्याज मिळते.  अशात  २१ वर्षानंतर मॅच्युरिटी नंतर ही रक्कम ६३,४२ हजार  ५८९ इतकी रक्कम होते.

maturity सरकारी योजना सुकन्या समुद्धी योजना सुकन्या समुद्धी योजना Sukanya Samuddhi Yojana
English Summary: This scheme is beneficial for girls, they get lakhs of rupees after maturity

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.