1. इतर

सरकारच्या 'या' योजनेतून फक्त एक रुपयात येतोय २ लाख रुपयांचा विमा

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


प्रत्येक नागरिकांना विमा पॉलिसीचा फायदा मिळावा यासाठी मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना(PMJJBY) या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना विम्याची सुविधा पुरवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत  वर्षाला ४०० रुपयांपेक्षा  कमी खर्चात ४ लाख रुपयांचा विमा सरकार देत आहे. या योजनेचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो. यातून आपल्याला अनेक इंश्योरेंस कव्हर मिळत असतात. यात अपघात विमा, डिसएबिवलिटी कव्हरआणि जीवन विमा कव्हर मिळतात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मोदी सरकारची योजना आहे.  याच्या अंतर्गत अपघात आणि डिसएबिलिटी कव्हर दिले जाते. यसाठी फक्त १२ रुपायांचा खर्च येतो. म्हणजे आपल्याला एका महिन्यासाठी फक्त एक रुपया खर्च करायचा आहे. या योजनेच्या अंतर्गत विमा धारकांचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आले  तर २ लाख रुपयांचा मोबदला मिळतो. तर आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मोबदला मिळतो. या योजनेचा लाभ १८ ते ७० वर्षापर्यंतचा कोणताही व्यक्ती घेऊ शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत आपल्याला ३३० रुपयात इश्योरेंज कव्हर मिळते. याप्रकारे तुम्ही ३४२ रुपयांचा हप्ता जमा करावा लागतो. यात आपल्याला तीन विमा मिळतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) या योजनेच्या लाभार्थी असेल आणि त्याचा मृत्यू जाल्यास नॉमिनीला २ लाख रुपयांचा विमा कव्हर मिळतो.  १८ ते ५० वर्ष वयाची कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.  ही विमा योजना ५५ वर्षापर्यंत लाईफ कव्हर देते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters