1. इतर बातम्या

कृषी-ग्रामीण पर्यटन व्यवसाय सुरू करा – दरमहा १ लाख कमवा

सध्याचे पर्यटक : सध्या शहरात राहणारे पर्यटक त्याच त्याच आधुनिक पर्यटन पद्धतीला वैतागले आहेत. महाबळेश्वर झाले, गोवा झाले, दुबई झाले, कुलुमनाली झाले, जवळजवळ सर्वच बघून झाले. सगळीकडे तेच एसी हॉटेल रूम आणि मुंबई पुण्यात मिळेल तेच जेवण, तेच तेच स्वीमींग पूल... कोणतेही नावीन्य व मजा उरली नाही. लोक आता नाविण्याच्या शोधात आहेत. त्यांना निसर्ग, झाडे, फुले, प्राणी, शेती इत्यादींच्या सहवासात त्यांना रमायचे आहे .

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कृषी पर्यटन :- हा अत्यंत नावीन्यपूर्ण व झपाट्याने वाढणारा व्यवसाय आहे.

कृषी पर्यटन :- हा अत्यंत नावीन्यपूर्ण व झपाट्याने वाढणारा व्यवसाय आहे.

निसर्गाचा आनंद लुटायला आहे. त्यांना एसी रूम नको आहे... हवी आहे ती बोचरी व गुलाबी थंडी... त्यांना पिझ्झा, नुडल्स नको आहेत, त्यांना हवे पिठलं-भाकरी आणि दही... त्यांना आता आईस्क्रीम नकोय, पाहिजे ती मस्त थंडगार लस्सी... 

 

कृषी पर्यटन :- हा अत्यंत नावीन्यपूर्ण व झपाट्याने वाढणारा व्यवसाय आहे. अनेक नवीन पर्यटक या प्रकारच्या पर्यटनाला पसंती देत आहेत . गावाकडे जाणे, झाडावरील घरात राहणे, जंगलात तंबू ठोकून राहणे, अस्सल ताज्या व गावरान जेवणावर ताव मारणे, बैलगाडी व घोड्यावरून सैर करणे, आंबा, काजू, द्राक्षे, डाळिंबीच्या बागेत फिरणे, आयुर्वेदिक मसाज घेणे, इत्यादी. ज्यांची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे, त्यांना या कृषी पर्यटनाची खूप आवड असते.

केरळ आघाडीवर :- कृषी पर्यटनात केरळ राज्य देशात आघाडीवर आहे . जगभरातून सुमारे ३ लाख पर्यटक केरळला जातात. तिथल्या आयुर्वेदीक तेलाचा मसाज सुप्रसिद्ध आहे . झाडवरची घरे, केळीच्या बागा, काजूंच्या बागा, सुपारीच्या बागा आणि यांच्या परिसरामध्येच बांधलेल्या कौलारू खोल्या पर्यटकांना खूप आवडतात. अशा कौलारू खोलीला दिवसाही २ हजारापर्यंत भाडे मिळते .

 

हे करा : तुम्हाला जर तुमच्या शेतात कृषी पर्यटनाचा व्यवसाय करायचा असेल तर, तुमच्याकडे किमान ५ एकर शेती हवी. त्यात विविध प्रकारच्या भाज्या उदा. वांगी, मेथी, पालक, भेंडी, कारली, दोडका, तोंडली इत्यादीची लागवड करा. पीकांमध्ये मका, ऊस, नारळ, केळी, पपई, चिंच, जाभूळ, पेरु, सीताफळ इत्यादी लावा . प्राण्यामध्ये बैलगाडी, घोडागाडी, पाण्याचा हौद, इत्यादीची सोय करा. देशी कोंबड्या, बदक, इमू इत्यादीही पाळा. दुभत्या गाई , म्हैशीही हव्यात. शेतात कौलारू किमान चार खोल्या आवश्यक. स्वच्छ अंथरूण, पांघरूण,भांडी इत्यादी हवे .

 

 झीरो रीस्क : हा व्यवसाय झीरो रीस्कचा आहे. जशी तुम्ही-आम्ही शेती करतो तशीच करायची आहे. फक्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी थोडीशी पद्धत बदलायची आहे. तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग केल्यास किमान ५० पर्यटक महिन्याला मिळू शकतात. नाही मिळाले किंवा कमी मिळालेत तर तुमचे काही नुकसान होणार नाही .

वातावरण : पर्यटक तुमच्या शेतावर येतील. त्यांना स्वच्छ खोली , आरोग्यदायी जेवण व पाण्याची सोय करा. सकाळी चुलीवर तापवलेले व कडुनिबांची पाने टाकलेले आयुर्वेदीक पाणी द्या. दात घासण्यासाठी कडूनीबांच्या काड्या, चहा ताज्या दुधाचा व गवतीचहा टाकलेला, नाष्ट्यात ज्वारीची व तांदळाची गरम भाकरी, दही व चटणी सोबत पातीचा कांदा, जेवणात भरलेल वांग, देशी तांदळाचा भात... देशी कोंबडीचा तांबडा कडक रस्सा तो रात्रीच्या जेवणात, मातीच्या गाडग्यात ठेवलेला मस्त थंडगार मठ्ठा, पर्यटकांना बैलगाडी, घोड्यावरून फिरणे, सकाळी शेणकूटाची शेकोटी करून त्यावर मस्त मक्याची कणसे भाजा व ताव मारा. सोबत लिंबू मीठ द्या. स्वच्छता पाळा. पण शहरी हॉटेलप्रमाणे नको. कमी मसाला वापरलेले अस्सल देशी ग्रेव्ही द्या. पतंग उडवणे, विटी दांडू , गोट्या, सुरपाट, कब्बडी, हादगा , हालगी, लेझिम, ढोल, भवरा, गजगे, लगोर इत्यादी ग्रामीण खेळ व संगीतांचे आयोजन करा. पर्यटकांचा सहभाग त्यात जरूर ठेवा. वातावरण घरगुती ठेवा . 

 

इंटरनेटवर मार्केटिंग : या लेखात लिहलेल्या सर्व पदार्थ, खेळ, वातावरण यांचे अस्सल फोटो व व्हीडिओ काढून तोंडाला पाणी सुटेल अशी वेबसाईट बनवा . ती सर्च इंजिन , सोशलमीडिया, फेसबुक , युटूब , ट्रॅव्हल साईट वर टाका. रोज लॅपटॉप वर बसून त्याचा प्रचार व प्रसार करा.

बघा तुम्ही कृषी पर्यटनाची कल्पना कशी जगभर पसरेल. जर केरळमध्ये पर्यटक अमेरिका, युरोप , दुबईतून येत असतील तर महाराष्ट्रात का नाही?

भांडवल व फायदा : या व्यवसायला वेबसाईट, मार्केटींग, साहित्य, भांडी, शेतीतील थोडीशी संचानात्मक बदल इत्यादीसाठी ५ लाखापर्यंत भांडवल लागेल . दरमहा ५० पर्यटक येवू शकतात. तुम्हाला दरमहा १ लाख रुपया पर्यंतचा फायदा होऊ शकतो. 

आमची मदत हवी का? : आपल्यालाही कृषी पर्यटन व्यवसाय सुरु करायचा आहे का? आम्ही आपल्याला संपूर्ण व्यवसाय प्रक्रियेत एन्ड टू एन्ड मार्गदर्शन व सहाय्य प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम या उद्योगाबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. हा उद्योग कसा सुरु करावा? त्याचे लोकल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्केट किती मोठे आहे? आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग कसे करावे? आपल्या ब्रॅण्डला मार्केट मिळवून देण्यासाठी आम्ही सहाय्य नक्कीच करू. आम्ही आपला कृषी पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी आपली संपूर्ण मदत करण्याची खात्री देतो. तुम्हीही एक पाऊल पुढे टाका. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

आणि आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आमचा नंबर +९१ ८१०४९००८५५ जोडा.

संपर्क -प्रकाश भोसले

कॉल करा: +९१ ८१०४९००८५५

व्हॉट्सअ‍ॅप: +९१ ८१०४९००८५५

English Summary: Start agriculture tourism business. Published on: 04 September 2021, 12:08 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters