1. इतर बातम्या

स्किल इंडिया मिशन अंतर्गत तरुणांना सरकारकडून टर्निंग आणि रोजगार

देशातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये केंद्र सरकारने स्किल इंडिया मिशन ची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार 24 लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय क्षेत्रातील लागणारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
skill india mission

skill india mission

 देशातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये केंद्र सरकारने स्किल इंडिया मिशन ची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार  24 लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय क्षेत्रातील  लागणारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील.

 या योजनेच्या माध्यमातून ज्या तरुणांनी दहावी बारावी नंतर ज्यांनी शाळा सोडून दिली आहे व जे तरुण कमी शिक्षित आहेत अशा तरुणांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाते.

 स्किल इंडिया मिशन अंतर्गत येणाऱ्या युवा कौशल्य विकास योजनेत समाविष्ट होण्यासाठी तरुणांना कुठल्याही प्रकारची फी देण्याची गरज नसते. या योजनेअंतर्गत  तरुण तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेत नोंदणी करू शकता. संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सध्या उमेदवाराला हे प्रमाणपत्र दिले जाते.

 जे पूर्ण  देशभरात वैध असते. तसेच तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मेळाव्याच्या   माध्यमातून नोकरी मिळवण्यासाठी मदत केली जाते. या योजनेअंतर्गत तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फर्निचर, फिटिंग, हस्तकला तसेच चामड्याचा उद्योग अशा सुमारे 40 पेक्षा जास्त तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीनुसार प्रशिक्षण दिले जावे असा सरकारचा आग्रह आहे कारण दरवर्षी तरुणांना वर्क  फोर्स मध्ये समाविष्ट केले जावे. या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगार मिळवून देणे तसेच ते स्वतः इतरांनाही रोजगार देऊ शकतात एवढ त्यांना सक्षम करणे हे आहे.

 या योजनेच्या माध्यमातून दर पाच वर्षात कौशल्य प्रशिक्षण देऊन एक कोटीहून अधिक लोकांना स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

 अर्ज कसा करावा?

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात आगोदर तुम्हाला स्किल इंडिया मिशनच्या अधिकृत वेबसाईट org भेट द्यावी.
  • त्यानंतर फाईंड ट्रेनिंग सेंटर चा पर्याय येईल त्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायचे आहे ते सिलेक्ट करावे लागते.
  • त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करावे.
English Summary: skill india mission Published on: 22 June 2021, 11:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters