शिशु मुद्रा लोन घेणाऱ्यांना सरकारची १५०० कोटींची मदत ; जाणून घ्या का मिळाली मदत

19 May 2020 01:16 PM By: KJ Maharashtra


केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची सविस्तर माहिती दिली. कोणकोणत्या क्षेत्रातील लोकांना याचा फायदा होणार याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  दिली.  कोरोना सारख्या संकटात  शेतकऱ्यांसह छोटे -मोठे उद्योग करणाऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.  दरम्यान या घोषणांसह सीतारमण यांनी मुद्रा शिशु लोनच्या (Shishu Mudra Scheme) संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

मु्द्रा स्कीम लोन घेणाऱ्यांना व्याजातून दोन टक्क्यांची सूट मिळणार आहे, ही सूट पुढील १२ महिन्यांपर्यंत असणार आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्यांचे १५०० कोटी रुपये वाचणार असून, हा पैसा आता सरकार भरणार आहे.  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीची घोषणा केली होती, मुद्रा शिशु लोनसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांची मदत करेल.  ही मदत एका वर्षाचे व्याजदर कपात करून देण्यात येणार आहे.  याचा फायदा तीन कोटी लोकांना होणार असून आता पर्यंत १.६२ कोटी लोकांना कर्ज देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

कोण घेऊ शकतो हे कर्ज - छोट्या व्यापारांना मदत करणाऱ्यांचा उद्देश केंद्र सरकारचा आहे.  या योजनेंतर्गत फक्त छोट्या व्यापाऱांना कर्ज मिळू शकते. मुद्रा योजना (PMMY) च्या अंतर्गत तीन टप्प्यात सरकार हे कर्ज देते.  केंद्र सरकारने या योजनेची शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन अशी वर्गवारी केली आहे.  या योजनेतून आपण दुकान सुरू करण्यासाठी किंवा इतर उद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. तर किशोर योजनेत आपण ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो.  तरुण लोन योजनेतून जर आपल्याला काही उद्योग सुरु करायचा असेल तर बँक आपल्याला ५ लाख ते १० लाखापर्यंतचे कर्ज देते. कोणत्याच बँकेत आपण गेल्यास आपल्याला कर्जाची सुविधा मिळेल.

Shishu Mudra Scheme Nirmala Sitharaman Finance Minister Nirmala Sitharaman शिशु मुद्रा लोन घेणाऱ्यांना सरकारची मदत मुद्रा शिशु लोन योजना पंतप्रधान मुद्रा योजना PMMY pradhanmantri mudra yojana
English Summary: shishu mudra scheme holder get 1500 crore aid from government

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.