1. इतर

ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींना दर महिन्याला मिळतील ३ हजार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

मोदी सरकार समाजातील सगळ्या घटकांच्या विकासासाठी नवनवीन प्रकारचे नियमांमध्ये बदल किंवा नवीन नियम, वेगळ्या प्रकारच्या योजना आणत आहेत. या सगळ्या योजनाचा भाग म्हणुन पुन्हा एकदा मोदी सरकारने गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना समोर ठेवून एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा २०१९ ला केली होती. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.

या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींना दर महिन्याला ३ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत जवळजवळ 45 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाचे आठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये किमान पेन्शन दिली जाईल. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2019 मध्ये सुरू केली होती.या योजनेत कमीत कमी 18 वर्षे वय तर जास्तीत जास्त चाळीस वर्षाच्या समाजाचे असे श्रमिक सहभागी होऊ शकतात. ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

 

या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन

 या योजनेअंतर्गत 55 रुपये ते दोनशे रुपये महिना गुंतवणूक केली जाऊ शकते.  यामध्ये वयापरत्वे म्हणजेच अठरा वर्षाच्या व्यक्तींना दर्मा पंचावन्न रुपये आणि तीस वर्षाच्या व्यक्तीला शंभर रुपये, 40 वर्षीय व्यक्तीला दोनशे रुपये महिना भरावा लागतो. समजा जर एखाद्या श्रमिका ने वयाच्या अठराव्या वर्षी संबंधित योजनेत आपली नोंदणी केली तर त्याला एका वर्षाला 660 रुपये जमा करावे लागतात. जर पूर्ण साठ वर्षाचा विचार केला तर संबंधित सैनिकाचे 27700 वीस रुपये या योजनेत गुंतवणूक होते.  साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला दरमहा तीन हजार रुपये मिळतात.

  

या योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

 या पेन्शन योजनेमध्ये नाव नोंदवण्यासाठी लाभधारकांना त्यांचे आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन कॉमन सर्विस सेंटर ला जाऊन खाते सुरू करावे लागते. संबंधित खाते सुरू झाल्यानंतर श्रमिकांना श्रम्योगी कार्ड जारी केले जाते. अधिक तपशीलवार माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1800 267 6888

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters