Schemes For Women: महिलांना आत्मनिर्भर बनवतील या तीन कर्ज योजना; जाणून घ्या! कर्जाची माहिती

17 July 2020 08:22 PM By: भरत भास्कर जाधव


महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बँका अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. महिलांचे सबलीकरण व्हावे हे या योजनांमागील उद्देश आहे. या योजनाचा लाभ घेऊन महिला आपल्या स्वताचा व्यवसाय सुरु करू शकतील किंवा चालू असलेला व्यवसाय पुढे व्यवस्थिपणे वाढवतील. या लेखातून महिलांसाठी कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत, याची माहिती घेऊया.

अन्नपूर्णा स्कीम (Annpurna Scheme) 

 जर आपल्याला स्वयंपाक बनवण्याची आवड आहे, आणि आपण आपला स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण फूड कॅटरिंगच्या व्यवसायासाठी  (Food Catering Business) या योजनेचा फायदा घेऊ शकता.

 यात टिफिन सर्व्हिस किंवा पॅक स्नॅक्स इत्यादीचे काम करु शकतात. यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ म्हैसूरशी संपर्क करा.

किती मिळेल कर्ज - या योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळू शकते. हे कर्ज आपल्याला ३६ महिन्यात फेडावावे लागते. या कर्जाचे व्याज बाजारात चालू असलेल्या दराप्रमाणे आकारले जाते.

स्त्री शक्ती पॅकेज स्कीम (Stri Shakti Package Scheme)

या योजनेच्या अंतर्गत कंपन्यांना कर्ज मिळते ज्या कंपन्यांमध्ये  महिलांची हिस्सेदारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. यासाठी व्याजदर फार कमी असते.

किती मिळते कर्ज - या योजनेतेर्गंत ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आपणांस मिळते. जर आपण ५ लाखाचे कर्ज घेणार असाल तर आपल्याला कोर्ड सिक्योरिटी द्यावी लागत नाही. या कर्जासाठी आपण एसबीआय या बँकेशी संपर्क करावा.

उद्योगिनी स्कीम  -  (Udhyogini Scheme)

या योजनेच्या आधारे महिलांना छोट्य़ा पातळीवर व्यवसाय सुरु करता येतात. रिटेल बिझनेस आणि एग्रीकल्चर एक्टिविटीजसाठी आपण कर्ज मिळवू शकता. यासाठी वयाची पात्रता ही १८ ते ४५ वर्षापर्यंतची आहे.  किती मिळेल कर्ज  - या योजनेतून आपल्याला एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी आपण पंजाब एंड सिंध बँकेशी संपर्क करावा.

Schemes For Women loan schemes Annpurna Scheme अन्नपूर्णा स्कीम Food Catering Business फूड कॅटरिंग टिफिन सर्व्हिस Tiffin service Stri Shakti Package Scheme स्त्री शक्ती पॅकेज स्कीम स्टेट बँक ऑफ म्हैसूर State Bank of Mysore उद्योगिनी स्कीम Udhyogini Scheme पंजाब एंड सिंध बँक एसबीआय बँक sbi bank Punjab and Sind Bank
English Summary: Schemes For Women: Take advantage of these three loan schemes that will make women self-reliant

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.