1. इतर बातम्या

एलआयसी ने लॉन्च केली सरल पेन्शन योजना, जाणून घेऊ काय आहेत फायदे या योजनेचे?

एल आय सी आय विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून कायम आकर्षक योजना ग्राहकांसाठी बाजारात आणत असते. गुरुवारी एक जुलै रोजी भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एलआयसी ने सरल पेन्शन योजना लॉन्च केली. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. याचा अर्थ तुम्हाला या योजनेमध्ये फक्त एकदाच हप्ता भरावा लागणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
saral pention yojana

saral pention yojana

 एल आय सी आय विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून कायम आकर्षक योजना ग्राहकांसाठी बाजारात आणत असते. गुरुवारी एक जुलै रोजी भारतीय जीवन विमा निगम म्हणजे एलआयसी ने सरल पेन्शन योजना लॉन्च केली. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक सिंगल प्रीमियम  योजना आहे. याचा अर्थ तुम्हाला या योजनेमध्ये फक्त एकदाच हप्ता भरावा लागणार आहे.

 त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ पेन्शनच्या  रूपात आयुष्यभर मिळणार आहे. तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कल्याण मध्ये पोलिसीहोल्डर ला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेनंतर सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळण्याची सोय आहे.

 याबाबतीत एलआयसी ने सांगितले की, हा एक नॉन लिंकड, नॉन पार्टिसिपेटिंग, सिंगल प्रीमियम तसेच इंडिव्हिज्युअल येन्युटी प्लान आहे. ही योजना ही भारतीय विमा मंडळ आणि विकास प्राधिकरण म्हणजे  आय आर डी ए आयआमच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू करण्यात आली आहे.

 ही योजना घेण्यासाठी चे दोन पर्याय

 यामध्ये पहिला पर्याय दिला आहे तो लाइफ इनुटी 100% रिटन ऑफ परचेस प्राईस हा होय. हा पहिला पर्याय पेन्शन सिंगल लाईफ साठी आहे. याचा अर्थ असा होतो की ही पेन्शन कोणाही एका व्यक्तीशी जोडलेली असेल. म्हणजे पेन्शन धारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. पोलिसी होल्डर च्या मृत्यूनंतर त्यांनी पॉलिसी घेण्यासाठी जो बेस प्रीमियमची गुंतवणूक केली होती, तो त्यांच्या मुलीला परत मिळेल. तसेच मोठा झालेला टॅक्स परत मिळत नाही.

 दुसरा पर्याय

दुसरा पर्याय हा जॉईंट लाइफसाठी दिला जातो.म्हणजे या पर्यायांमध्ये पेन्शनही पती-पत्नी दोघां मध्ये जोडली गेलेली असते. या पर्यायांमध्ये पत्नी किंवा पती पैकी जो कोणी जिवंत राहील त्यांना  या योजनेनुसार पेन्शन मिळत राहते. जेवढी पेन्शन दोघांना मिळते तेवढी पेन्शन एकाच्या  मृत्यूनंतर एका व्यक्तीला मिळते.

जेव्हा यामध्ये दोघांचा मृत्यू होतो तेव्हा जमा झालेली बेस प्राईस नॉमिनी  ला दिली जाते. असे हे दोन पर्याय  पॉलिसीत  दिले आहेत.

 सरल पेन्शन योजना ही इंमेडिएट एन्युटी प्लान आहे. म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर लगेच त्याला पेन्शन सुरू होते. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शन प्रत्येक महिन्याला हवी कि तीन महिन्यात हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त तुम्हाला त्यानुसार तुमचा पेन्शन प्लान निवडावा लागणार आहे.  तसेच सहामाही आणि वार्षिक असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

English Summary: saral pention yojna Published on: 02 July 2021, 11:28 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters