1. इतर बातम्या

रॉयल एनफिल्डची दमदार बाईक क्लासिक 350, जाणून घेऊन तीचे जबरदस्त फीचर्स

रॉयल एनफिल्ड म्हटले म्हणजे तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बुलेटची क्रेझ आहे. रॉयल एनफिल्ड चे सगळेच मॉडेल एकदम दमदार आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-z news

courtesy-z news

 रॉयल एनफिल्ड म्हटले म्हणजे तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बुलेटची क्रेझ आहे. रॉयल एनफिल्ड चे सगळेच मॉडेल एकदम दमदार आहेत.

 परंतु कंपनीच्या या सगळ्या बाईक मध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही बाईक भारती कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. या लेखात आपण या बाईक विषयी माहिती घेऊ.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईकचे  वैशिष्ट्ये

 1 सप्टेंबर रोजी कंपनीने या बाईकचे अधिकृत लॉन्चिंग केले आहे रॉयल एनफिल्ड 350 हे पूर्णपणे आधुनिक व नव्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हे बाइक रॉयल एनफिल्ड कंपनीने नव्या J प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कंपनीने  Royal Enfield Meteor 350 मध्ये केला आहे.या कंपनीची ही नवी बाईक G2 मॉडेल पासून इन्स्पायर्ड आहे.

तसेच या बाइकच्या हँडलँडडिझाईन पासून पेट्रोल टॅंक,मडगार्ड, कलर कॉम्बिनेशन आणि डिस्क ब्रेक पर्यंत क्लासिक लूक रिफ्रेश  केला गेला आहे. या वैशिष्ट्यांमुळे ही बाईक पूर्णपणे नवीन ठरते. शहरातील रस्ते ते एडवेंचर टुरिझम या गोष्टी लक्षात घेऊन ही बुलेट बनविण्यात  आली आहे.

क्लासिक 350 मध्ये Meteor 350 cruiser प्रमाणे 349 सीसी फ्युएलइंजेक्टेड इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन 20.2bhp पर्यंत पावर आणि 27 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड गिअर बॉक्ससह कंपनीच्या नव्या J आर्किटेक्चरवरबुलेट डेव्हलप करण्यात आले आहे.

English Summary: royal enfield bike classic 350 launch Published on: 05 September 2021, 10:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters