पंतप्रधान जन धन योजना : पैसा नसतांनाही बँकेतून मिळवा ५ हजार रुपये

25 June 2020 06:40 PM By: भरत भास्कर जाधव


प्रत्येकाचे बँकेत खाते असावे अशा उद्देशाने मोदी सरकारने जन धन नावाची योजना सुरू केली.  ही योजना सुरू करुन साधरण तीन चार वर्ष झाली असतील तरीही योजनेविषयी आणि योजनेच्या सुविधेविषयी पुरेशी माहिती नाही आहे. हे एक सामान्य बँक खाते असल्याची मत नागरिक बनवत असतात, पण नाही मित्रांनो जनधन खाते असेल तर त्यातून आपल्याला अनेक काही सुविधा मिळत असतात. आज आपण ते जाणून घेणार आहोत.    

पंतप्रधान जन धन योजनेतून उघडलेले हे एक बचत खाते आहे, पण इतर बचत खात्यांपेक्षा या खातेतून आपल्याला अधिक सुविधा मिळतात. जनधन खात्यातून इतर सुविधा मिळण्यासह आपल्याला खाते उडल्यानंतर ३० हजार रुपयांचा बिमा देखील मिळतो. यासह २ लाख रुपयांच्या अपघाती विम्यातील डेथ कव्हर विमा आणि ५ हजार रुपयांचा ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते. जी इतर बचत खात्यांमध्ये मिळत नाही. जर आपल्या खात्यात शुन्य रुपये बाकी असेल तरीही आपण ओव्हरड्राफ्टच्या सुविधेतून ५ हजार रुपये काढू शकतात. यासाठी फक्त एक अट आहे, ती म्हणजे जनधन खाते पीएमजेडीवाय, आधारकार्डशी लिंक असावे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा कशी वापरू शकता - या सुविधेचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता हा प्रश्न सहज आपल्या मनात येतो. काळजी करु नका आम्ही याचे उत्तर ही देत आहोत, आपले खाते हे साधरण सहा महिने जूने असावे. या सहा महिने जुन्या खात्यात पैसे होते आणि आपण वेळोवेळी व्यवहार केलेले पाहिजे.  जनधन खाते उघडण्यासाठी आपल्याला जास्त कागदपत्रांची गरज नसते. आपण आपले मुळ काही कागदपत्रे घेऊन जरी बँकेत गेलात ततरी आपले खाते उघडण्यात येईल.

jan dhan yojana jan dhan account pradhanmantri jan dhan yojana withdraw 5 thousand rupees पंतप्रधान जन धन योजना जन धन योजना जन धन खात्यात काढा पाच हजार रुपये जन धन बँक खाते
English Summary: Pradhanmantri Jan dhan yojana : withdraw 5 thousand rupees from your account even you don't have balance

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.