प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना; १२ रुपयांच्या प्रीमियममध्ये मिळेल दोन लाखापर्यंत विमा

06 May 2021 06:12 AM By: KJ Maharashtra
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

आपण सगळेजण विमा का काढतो त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटापासून आर्थिक संरक्षण व्हावे किंवा आर्थिक आधार मिळावा यासाठी काढतो.  सध्या बाजारात विविध प्रकारच्या एलआयसीच्या किंवा इतर कुठल्याही विमा कंपन्यांचे पॉलिसी प्लान उपलब्ध आहेत. परंतु काही विमा प्लॅनचे प्रीमियम ते अत्यंत मोठ्या रकमेच्या असतात.

नवीन सर्वसामान्य लोकांना जास्त प्रीमियम भरणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी किंवा त्यांना विमा कवच मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. या विमा योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,  वर्षाला फक्त बारा रुपयाचा प्रीमियम देऊन तुम्ही दोन लाखांपर्यंत चा विमाचा लाभ घेऊ शकता. इतर विमा योजनेच्या तुलनेने ही अपघात विमा योजना अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे.दुर्बल घटकातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचे आयुष्य सुरक्षित करण्याबरोबरच त्यांना संकटसमयी मदत मिळावी यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती.

  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे मिळणारे विमा कवच

 पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जर एखाद्या अपघातात विमाधारकाच्या मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंब किंवा नॉमिनेट  व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात. तसेच अपघातावेळी ती व्यक्ती अर्धवट अपंग असेल तर त्याला एक लाख रुपये दिले जातात तसेच पूर्णपणे अपंगत्व आले तर दोन लाख रुपये पूर्ण दिले जातात.

 

ही पॉलिसी कोण घेऊ शकते

 ही  पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्ष वयोगटात असावे.या पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी बारा रुपयांची प्रीमियम ऑटोमॅटिक वजा केले जातात. जर आपल्याला ही पॉलिसी बंद करायचे असेल तर आपले ज्या बँकेत खाते आहे तिथे जाऊन अर्ज देऊन आपण ती बंद करू शकतो.

 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज कसा करावा

 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँकेत सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे.  तसेच बँक खाते आणिआधार कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक आहे. अर्जाचा फॉर्म भरून तसेच आधार कार्ड, बँक पासबुक, वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला यांच्या छायाप्रती बनवून पासपोर्ट आकाराचा फोटो ठेवा. अधिक माहितीसाठी आपण

https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY. Aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज प्रधानमंत्री सुरक्षा विमा Pradhan Mantri Suraksha Vima Yojana insurance
English Summary: Pradhan Mantri Suraksha Vima Yojana; Insurance up to Rs 2 lakh at a premium of Rs 2

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.